शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

WhatsApp वापरताना मोबाईल डेटा वाचवायचाय?, "या" ट्रिक्स करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 4:31 PM

WhatsApp News : व्हॉट्सअ‍ॅपचा डेटा वाचवण्याच्या काही ट्रिक्स आहेत. त्या जाणून घेऊया.

नवी दिल्ली -  व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. मात्र अनेकदा याचा वापर करताना मोबाईल डेटा लवकर संपतो अथवा जास्त वापरला जातो. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा चॅट करण्यासाठी, व्हॉईस-व्हिडिओ कॉलिंगसाठी आणि मीडिया फाईल्स पाठवण्यासाठी हमखास केला जातो.  व्हॉट्सअ‍ॅपचा डेटा वाचवण्याच्या काही ट्रिक्स आहेत. त्या जाणून घेऊया.

कॉल क्वॉलिटी

दररोज कितीतरी लोक आपल्याला व्हाईस किंवा व्हिडीओ कॉलिंगच्या सुविधेचा वापर करतात. मात्र कॉल करताना तुम्ही मोबाईल डेटा वाचवू शकता. पण त्यामध्ये कॉल क्वॉलिटी आधीसारखी नसणार आहे. 

WhatsApp Tips and Tricks : "या" स्टेप्स करा फॉलो

-  सर्वात आधी व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग ऑप्शनमध्ये जा.

- सेटिंग्समध्ये तुम्हाला स्टोरेज अँड डेटा पर्याय दिसेल.

- मीडिया ऑटो डाऊनलोड ऑप्शनवर यूज लेस डेटा फॉर कॉल्स हा पर्याय मिळेल. या फीचरला इनेबल करा.

ऑटो-डाऊनलोड मीडिया फाईल्स

 व्हॉट्सअ‍ॅपवर रिसीव्ह होणाऱ्या मीडिया फाईल्स ऑटो डाऊनलोड होण्याची शक्यता असते. ज्यामुळे डेटा जास्त जातो. तसेच स्टोरेज सुद्धा भरून जाते. हे दोन्ही वाचवायचं असेल तर ऑटो डाऊनलोड मीडिया फाईलला डिसेबल करा.

- सर्वप्रथम  व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्समध्ये जा.

- सेटिंग्समध्ये तुम्हाला स्टोरेज अँड डेटा युसेज पर्याय मिळेल. यावर क्लिक करा.

- यानंतर मीडिया ऑटो डाउनलोड ऑप्शन मिळेल. या ठिकाणी सर्वात पहिला ऑप्शन When using Mobile Data दिसेल.

- तुम्ही मोबाईल डेटा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर चार पर्याय दिसतील. फोटो, ऑडियो, व्हिडीओ आणि डॉक्यूमेंट. यात ज्या ऑप्शनवर तुम्ही बंद किंवा डिसेबर करू शकता त्या ऑप्शनवर क्लिक करा.

चॅट बॅकअप

फोटो, व्हिडीओ आणि अन्य काहींचा बॅकअप घेणं गरजेचा आहे. बॅकअप दरम्यान डेटा जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार या फीचरला डिसेबल करू शकता.

- सर्वप्रथम तुम्ही तुमच्या  व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिग्समध्ये जा.

- यानंतर चॅट पर्यायावर क्लिक करा.

- खाली बॅकअप ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा. तुमच्या गरजेनुसार यावर क्लिक करू शकता. या फीचरला इनेबल किंवा डिसेबल करू शकता.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल