शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे IRCTC ची ई-वॉलेट सुविधा? कशी बुकिंग केली जातात ट्रेनची तिकिटं? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 10:59 IST

IRCTC E-Wallet : भारतीय रेल्वेकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन पद्धतीने रिझर्व्हेशन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

IRCTC E-Wallet : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय रेल्वेने प्रवास करणे खूप सोयीचे आहे. तसेच, प्रवासादरम्यान आपल्याला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून बहुतेक लोक प्रवासापूर्वी आपले रेल्वे तिकीट बुक करतात. यासाठी भारतीय रेल्वेकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन पद्धतीने रिझर्व्हेशन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

ऑफलाइन रिझर्व्हेशन तुम्हाला रेल्वे काउंटरवर जाऊन करावे लागेल. तर ऑनलाइन रिझर्व्हेशन तुम्ही आयआरसीटीसी वेबसाइट आणि अॅपद्वारे तिकिटे बुक करू शकता. जर तुम्ही ऑनलाइन ट्रेनचे तिकीट बुक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ऑनलाइन तिकिटे बुक करताना तुमचे पेमेंट फेल होणार नाही. कारण, आयआरसीटीसी ई-वॉलेट तुमच्यासाठी एक उत्तम ऑप्शन बनला आहे. आयआरसीटीसी ई-वॉलेटद्वारे तिकिटे कशी बुक करता येतील? याबाबत जाणून घेऊ शकता.

आयआरसीटीसी ई-वॉलेटचे काय फायदे?जेव्हा तुम्ही कुठेतरी जाण्यासाठी ऑनलाइन ट्रेन तिकीट बुक करता. तेव्हा तुम्हाला आयआरसीटीसी वेबसाइट किंवा अॅपवर पेमेंट गेटवे चार्ज भरावा लागेल. पण, जर तुम्ही आयआरसीटीसी ई-वॉलेट वापरत असाल तर तुम्हाला पेमेंट गेटवे चार्ज भरावा लागणार नाही. यामध्ये पेमेंट प्रोसेस इतर पेमेंट मोड्सच्या तुलनेत फास्ट आहे. म्हणजेच तुम्हाला तिकीट बुकिंगवेळी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.

जर एखाद्या परिस्थितीत तुमचे तिकीट बुकिंगवेळी रद्द झाले तर काळजी करण्याची गरज नाही. कारण, तुमचा परतावा तुमच्या ई-वॉलेटमध्ये लगेच जमा होतो. तुम्ही तुमच्या बँक खात्यातून यूपीआय, पेटीएम, अॅमेझॉन पे, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इतर कोणत्याही पद्धतीने ई-वॉलेटमध्ये पैसे जमा करु शकता. तुम्ही ते फक्त आयआरसीटीसी वेबसाइट आणि अॅपवर वापरू शकता.

आयआरसीटीसी ई-वॉलेटद्वारे तिकिटे कशी बुक करावी?आयआरसीटीसी ई-वॉलेट वापरण्यासाठी, तुम्हाला प्रथम आयआरसीटीसी वेबसाइटवर जावे लागेल आणि तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल. यानंतर, तुम्हाला IRCTC Exclusive सेक्शनमध्ये जाऊन eWallet चा ऑप्शन निवडावा लागेल. जर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आधीच आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर व्हेरिफाय झाले असेल तर तुम्हाला कोणतेही व्हेरिफिकेशन करावे लागणार नाही. 

अन्यथा तुम्हाला व्हेरिफिकेशन करावे लागेल. यानंतर तुम्हाला eWallet वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला टॉप अप करण्याचा ऑप्शन दिसेल. यानंतर तुम्ही यामध्ये यूपीआय, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे  पैसे जमा शकता. यामध्ये किमान १०० रुपये आणि जास्तीत जास्त १०००० रुपये जमा करता येतील. टॉप अप केल्यानंतर तुम्ही ट्रान्जक्शनसाठी आयआरसीटीसी ई-वॉलेट वापरू शकता.

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेtechnologyतंत्रज्ञान