शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोन पाण्यात पडलाय? तांदळाच्या डब्यात ठेवण्यापूर्वी करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 13:43 IST

फोन पाण्यात पडणे म्हणजे मोठे नुकसान असे आपल्याला वाटते, कारण बहुतेक कंपन्या 'लिक्विड डॅमेज'वर वॉरंटी देत नाहीत. मात्र, वेळीच सावधगिरी बाळगली तर तुमचा फोन पुन्हा सुस्थितीत येऊ शकतो.

रंगांचा सण होळी नुकताच पार पडला. रंगांच्या या उत्साहात अनेकदा आपण फोनची काळजी घ्यायला विसरतो. कोणाच्या तरी अंगावर पाणी उडवताना किंवा रंगात खेळताना तुमचा महागडा स्मार्टफोन पाण्यात पडला असेल किंवा भिजला असेल, तर आता टेन्शन घेऊ नका. फोन पाण्यात पडणे म्हणजे मोठे नुकसान असे आपल्याला वाटते, कारण बहुतेक कंपन्या 'लिक्विड डॅमेज'वर वॉरंटी देत नाहीत. मात्र, वेळीच सावधगिरी बाळगली तर तुमचा फोन पुन्हा सुस्थितीत येऊ शकतो.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

फोन पाण्यात पडल्यावर काय करावे?

त्वरीत स्विच ऑफ करा: फोन पाण्यातून काढल्याबरोबर सर्वात आधी तो स्विच ऑफ करा. फोन चालू राहिल्यास शॉर्ट सर्किट होऊन तो कायमचा खराब होऊ शकतो. फोन जास्त हलवू नका.

कव्हर आणि अ‍ॅक्सेसरीज काढा: फोनवर कव्हर असेल तर ते लगेच काढून टाका. तसेच सिम कार्ड ट्रे, मेमरी कार्ड आणि इतर कोणतीही जोडेलेली वस्तू बाहेर काढा, जेणेकरून हवा आत जाऊ शकेल.

कोरड्या कपड्याने पुसा: फोन एका मऊ आणि कोरड्या कापडाने वरून पूर्णपणे पुसून घ्या. चार्जिंग पोर्ट आणि हेडफोन जॅकच्या ठिकाणी जमा झालेले पाणी कापसाने टिपून घेण्याचा प्रयत्न करा.

हवादार ठिकाणी ठेवा: फोन पुसल्यानंतर तो अशा ठिकाणी ठेवा जिथे चांगली हवा खेळती असेल. फोन पूर्णपणे सुकेपर्यंत तो चार्जिंगला लावू नका किंवा चालू करण्याचा प्रयत्न करू नका.

विसरूनही 'या' चुका करू नका

१. हेअर ड्रायरचा वापर टाळा: अनेक जण फोन सुकवण्यासाठी ड्रायर वापरतात. ड्रायरची गरम हवा फोनच्या नाजूक अंतर्गत भागांना वितळवू शकते किंवा डॅमेज करू शकते.
२. फोन जोरात झटकू नका: पाणी काढण्यासाठी फोन हलवणे किंवा झटकणे चुकीचे आहे. यामुळे बाहेर असलेले पाणी फोनच्या अधिक खोलवर जाऊ शकते.
३. उन्हात ठेवू नका: कडक उन्हात फोन ठेवल्याने त्याची बॅटरी आणि स्क्रीन खराब होण्याची शक्यता असते.

तरीही फोन सुरू झाला नाही तर?

जर २४ तास सुकवल्यानंतरही तुमचा फोन सुरू होत नसेल, तर स्वतः प्रयोग न करता अधिकृत सर्व्हिस सेंटरवर घेऊन जाणेच हिताचे ठरेल. घरगुती उपायांपेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास फोन दुरुस्त होण्याची शक्यता अधिक असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Smartphone Wet? Do This Before Rice; Avoid Major Damage

Web Summary : Dropped your phone in water? Switch it off immediately, remove accessories, and dry it gently. Avoid using a hairdryer or shaking it. If it doesn't turn on after drying, seek professional help.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान