OnePlus 10R Pro 5G वर १७ हजारांपेक्षा अधिक सूट, ३२ मेगापिक्सेलचा आहे कॅमेरा; पाहा काय आहे ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 03:34 PM2023-04-01T15:34:28+5:302023-04-01T15:36:00+5:30

दिग्गज स्मार्टफोन कंपनी वनप्लसला भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे.

More than 17 thousand discount on OnePlus 10R Pro 5G 32 megapixel camera flipkart know details axis bank cards | OnePlus 10R Pro 5G वर १७ हजारांपेक्षा अधिक सूट, ३२ मेगापिक्सेलचा आहे कॅमेरा; पाहा काय आहे ऑफर

OnePlus 10R Pro 5G वर १७ हजारांपेक्षा अधिक सूट, ३२ मेगापिक्सेलचा आहे कॅमेरा; पाहा काय आहे ऑफर

googlenewsNext

दिग्गज स्मार्टफोन कंपनी वनप्लसला (OnePlus 10R Pro 5G) भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीत वनप्लस फोनवर मोठी सूट क्वचितच पाहायला मिळते. परंतु शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट सध्या कंपनीच्या सर्वात शक्तिशाली फोनपैकी एक असलेल्या OnePlus 10R Pro 5G वर 17,000 रुपयांपेक्षा जास्त सूट देत आहे. या स्मार्टफोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh पॉवरफुल बॅटरीने सुसज्ज आहे.

वनप्लसच्या या स्मार्टफोनची किंमत 66,999 रुपये आहे. या सवलतीनंतर स्मार्टफोनची किंमत 49,430 रुपये होईल. याशिवाय, तुम्हाला फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने व्यवहार केल्यावर 5 कॅशबॅक देखील मिळेल. हा OnePlus फोन 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.

स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन प्रोसेस
या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा QHD + Fluid AMOLED डिस्प्ले आहे जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याशिवाय Android 12 वर आधारित या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen चा शक्तिशाली चिपसेट देण्यात आला आहे.

5000mAh ची पॉवरफुल बॅटरी
त्याचबरोबर फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48MP प्रायमरी कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 8MP टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फोनमध्ये 32MP फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. तसंच 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान यामध्ये देण्यात आले आहे.

Web Title: More than 17 thousand discount on OnePlus 10R Pro 5G 32 megapixel camera flipkart know details axis bank cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.