Lokmat AI ची अद्भूत दुनिया: गाव बदलणारे एआय : ग्रामीण महाराष्ट्रात तंत्रज्ञानाची नवी क्रांती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:11 IST2026-05-04T15:09:57+5:302026-05-04T15:11:12+5:30

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: गावातील जीवन अधिक स्मार्ट आणि सोयीचे बनत आहे.

lokmat ai series village changing artificial intelligence a new technological revolution in rural maharashtra | Lokmat AI ची अद्भूत दुनिया: गाव बदलणारे एआय : ग्रामीण महाराष्ट्रात तंत्रज्ञानाची नवी क्रांती

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: गाव बदलणारे एआय : ग्रामीण महाराष्ट्रात तंत्रज्ञानाची नवी क्रांती

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: काही वर्षांपूर्वीपर्यंत एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजे फक्त मोठ्या शहरांमधील संगणक किंवा रोबोट्सशी संबंधित तंत्रज्ञान असे अनेकांना वाटत होते. पण, आज परिस्थिती बदलत आहे आणि बदलली आहे. आता एआय हळूहळू गाव, शेत आणि ग्रामीण जीवनातही पोहोचू लागले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शेतकरी, विद्यार्थी आणि शिक्षक एआयच्या मदतीने नवीन मार्ग शोधत आहेत. त्यामुळे गावातील जीवन अधिक स्मार्ट आणि सोयीचे बनत आहे.

शेतीत स्मार्ट एआयची मदत कशी होते?

महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. राज्यातील जवळपास ५५ ते ६० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. पाऊस कधी येईल? पिकांवर रोग येईल का? किंवा खत किती द्यावे? या गोष्टी शेतकऱ्यांसाठी नेहमीच मोठा प्रश्न असतात. आज एआयच्या मदतीने या प्रश्नांची उत्तरे मिळू लागली आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मायक्रोसॉफ्ट आणि इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्सिट्यूट फॉर द सेमी अॅरिड ट्रॉपिक्स यांच्या सहकार्याने एआय आधारित शेती प्रकल्प राबवले गेले आहेत. या प्रकल्पात शेतकऱ्यांना मोबाइलवर संदेश पाठवून पेरणीची योग्य वेळ, पाण्याचे नियोजन आणि खत व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले जाते. अभ्यासानुसार काही ठिकाणी उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे आणि ही खूप महत्त्वाची नोंद आहे.

विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

आजचे विद्यार्थी हे उद्याचे वैज्ञानिक, अभियंते आणि संशोधक आहेत. जर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी एआय, संगणक आणि विज्ञान यामध्ये रस घेतला, तर ते भविष्यात गावांसाठी नवीन तंत्रज्ञान तयार करु शकतात. कदाचित उद्या एखादा विद्यार्थी गावासाठी स्मार्ट शेती अॅप, पावसाचा अचूक अंदाज देणारी प्रणाली किंवा शिक्षणासाठी एआय आधारित साधन तयार करेल. गाव, शेती आणि शिक्षण यांना तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलू शकतो. एआय ही फक्त शहरांसाठी नाही, तर ती गावाच्या विकासासाठीही मोठी संधी आहे. योग्य शिक्षण, जिज्ञासा आणि प्रयोगशील वृत्ती असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही या नव्या तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करु शकतात.

विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण आणि भूमिका

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीही एआय एक मोठी संधी निर्माण करत आहे. महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये आता डिजिटल क्लासरूम आणि ऑनलाइन शिक्षण सुरु झाले आहे. काही शैक्षणिक अॅप्स एआयच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पद्धत समजून घेतात आणि त्यानुसार प्रश्न, सराव आणि व्हिडीओ देतात. त्यामुळे विद्यार्थी स्वतःच्या गतीने शिकू शकतात. आज ग्रामीण भारतातील सुमारे 40 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी मोबाइल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल शिक्षणाचा वापर करत आहेत.

हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांची तयारी

पाऊस हा शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आज एआय आणि उपग्रहांच्या मदतीने हवामानाचा अंदाज अधिक अचूक होत आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थे (इस्रो) च्या उपग्रहांद्वारे हवामान आणि जमिनीची माहिती गोळा करते. ही माहिती एआयच्या मदतीने विश्लेषित केली जाते आणि त्यातून पावसाचा अंदाज, दुष्काळाची शक्यता किंवा पूरस्थिती याबद्दल माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना आधीच तयारी करता येते.

गावातील आरोग्य आणि इतर सेवा

एआयचा उपयोग ग्रामीण आरोग्य सेवेतही होत आहे. काही ठिकाणी मोबाइल अॅप्सच्या मदतीने रोगांचे प्राथमिक निदान केले जाते. आरोग्य कार्यकर्ते मोबाइलद्वारे माहिती पाठवतात आणि डॉक्टर दूरवरुन सल्ला देऊ शकतात. त्यामुळे डॉक्टर कमी असलेल्या भागांमध्येही उत्तम आरोग्य सेवा मिळू शकते.

Moral

Artificial Intelligence is now helping rural areas in farming, weather prediction, education, and healthcare. With the help of Al and technology, villages can become smarter and more developed. Technology can transform villages when curious young minds learn to use it wisely.

- इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)
 

Web Title : एआई से बदला ग्रामीण महाराष्ट्र: कृषि, शिक्षा, स्वास्थ्य सेवा में क्रांति।

Web Summary : एआई ग्रामीण महाराष्ट्र को सशक्त बना रहा है, स्मार्ट समाधानों के साथ कृषि में क्रांति ला रहा है और डिजिटल शिक्षा के माध्यम से छात्रों की सहायता कर रहा है। सटीक मौसम पूर्वानुमान और बेहतर स्वास्थ्य सेवा पहुंच ग्रामीण जीवन को बदल रही है, विकास को बढ़ावा दे रही है।

Web Title : AI Transforms Rural Maharashtra: Revolutionizing Farming, Education, and Healthcare.

Web Summary : AI empowers rural Maharashtra, revolutionizing farming with smart solutions and aiding students through digital education. Accurate weather forecasts and improved healthcare access are transforming village life, fostering development.