Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आजच्या काळात शाळकरी मुलांचा अभ्यास आणि मनोरंजन मोठ्या प्रमाणावर इंटरनेटशी जोडलेले आहे. ऑनलाइन शिकवणी वर्ग, यूट्यूबवरील अभ्यासासंबंधी व्हिडिओ, शैक्षणिक अॅप्स किंवा माहिती शोधण्यासाठी गुगलचा वापर करणे या सर्व गोष्टी आपण सहज करतो; पण तुम्ही कधी विचार केला आहे का की इंटरनेटवर आपण जे काही करतो त्याची नोंद कुठेतरी होत असते? या नोंदींमधून तयार होणाऱ्या आपल्या ऑनलाइन ओळखीला डिजिटल फिंगरप्रिंट असे म्हणतात. जसे प्रत्येक व्यक्तीच्या बोटांचे ठसे वेगळे असतात. तसेच इंटरनेटवर प्रत्येक व्यक्तीची डिजिटल ओळखही वेगळी असते. आज या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मोठ्या प्रमाणावर वापरली जाते आणि त्यामुळे इंटरनेट अधिक स्मार्ट आणि उपयक्त बनत आहे.
१) इंटरनेटवर आपण काय करतो ते कसे लक्षात ठेवले जाते?
समजा तुम्ही मोबाइलवर बसून एखादा विज्ञानाचा व्हिडिओ पाहिला किंवा एखाद्या शैक्षणिक वेबसाईटवर जाऊन माहिती वाचली. त्यावेळी त्या वेबसाईटला तुमच्या उपकरणाबद्दल थोडीफार सामान्य माहिती मिळते. उदाहरणार्थ, तुम्ही मोबाइल वापरत आहात की संगणक, स्क्रीनचा आकार किती आहे, कोणता इंटरनेट ब्राउझर वापरला जात आहे किंवा तुम्ही साधारण कोणत्या शहरातून इंटरनेट वापरत आहात. ही माहिती हळूहळू जमा होत जाते आणि त्यातून तुमची एक डिजिटल ओळख तयार होते. ही ओळख म्हणजेच डिजिटल फिंगरप्रिंट.
२) एआय म्हणजे इंटरनेटचा हुशार मित्र
इंटरनेटवर दररोज लाखो लोक माहिती वापरतात, त्यामुळे प्रचंड प्रमाणात डेटा तयार होतो. हा डेटा समजून घेण्यासाठी आर्टिफिशयल इंटेलिजन्स (एआय) वापरली जाते. एआय म्हणजे असा संगणकीय मेंदू जो मोठ्या प्रमाणातील माहिती पाहून त्यातील सवयी आणि पॅटर्न ओळखू शकतो. उदाहरणार्थ, जर एखादा विद्यार्थी सतत विज्ञान, रोबोटिक्स किंवा अवकाशाबद्दलचे व्हिडिओ पाहत असेल तर एआयला कळते की त्याला विज्ञान विषयात रस आहे. त्यामुळे पुढच्या वेळी त्याला त्याच प्रकारची आणखी माहिती किंवा व्हिडिओ सुचवले जातात.
३) एआयमुळे इंटरनेट अधिक उपयुक्त कसे बनते?
आज जगातील मोठमोठ्या तंत्रज्ञान कंपन्या जसे की गुगल, मेटा आणि अॅमेझॉन या एआयचा वापर करून वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, तुम्ही जर एखाद्या विषयावर माहिती शोधली तर पुढे त्याच विषयाशी संबंधित व्हिडिओ, लेख किंवा माहिती तुम्हाला सुचवली जाते. त्यामुळे शिकणे अधिक सोपे, जलद आणि मजेशीर बनते. अनेक शैक्षणिक अॅप्सही एआयच्या मदतीने विद्याथ्याँच्या अभ्यासाची पद्धत समजून घेऊन त्यानुसार प्रश्न आणि सराव देतात.
४) एआय आपली सुरक्षा कशी जपते?
डिजिटल फिंगरप्रिंट आणि एआयचा उपयोग फक्त माहिती सुचवण्यासाठीच नाही, तर इंटरनेट अधिक सुरक्षित करण्यासाठीही होतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या खात्यात अचानक वेगळ्या देशातून लॉगिन करण्याचा प्रयत्न झाला तर एआय प्रणाली लगेच सावध होते. अशा वेळी सुरक्षेची तपासणी केली जाते किंवा वापरकर्त्याला सूचना दिली जाते. त्यामुळे ऑनलाइन बँकिंग, ई-मेल आणि इतर महत्त्वाच्या सेवांची सुरक्षा अधिक मजबूत बनते.
५) इंटरनेट वापरताना विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवावे?
इंटरनेट हे ज्ञानाचे खूप मोठे भांडार आहे; पण त्याचा वापर करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
भविष्यातले एआयचे डिजिटल जग कसे असेल?
भविष्यात एआय आणि डिजिटल तंत्रज्ञान आणखी प्रगत होणार आहे. शाळांमध्ये स्मार्ट शिक्षण, वैयक्तिक अभ्यास मार्गदर्शन आणि सुरक्षित इंटरनेट सेवा यासाठी एआय मोठी भूमिका निभावेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकता येईल आणि ज्ञान मिळवणे अधिक सोपे होईल. मात्र तंत्रज्ञानाचा वापर करताना जबाबदारी आणि जागरुकता तितकीच महत्त्वाची आहे.
Moral Story
A Digital Fingerprint is the unique identity created by a person's activities on the internet. Artificial Intelligence studies this data to understand user behavior, suggest useful content, and improve online safety. Use technology wisely, because every smart user makes the internet a better place.
- इंजि. अविनाश जाधव, एआय आणि टेक एज्युकेटर
Web Summary : Digital fingerprints track online activity, shaping personalized experiences. AI analyzes data, suggesting relevant content and enhancing learning. It also strengthens online security, detecting unusual account activity. Responsible internet usage ensures a safer, more beneficial digital future for students.
Web Summary : डिजिटल फिंगरप्रिंट ऑनलाइन गतिविधि को ट्रैक करते हैं, व्यक्तिगत अनुभवों को आकार देते हैं। एआई डेटा का विश्लेषण करता है, प्रासंगिक सामग्री का सुझाव देता है और सीखने को बढ़ाता है। यह असामान्य खाता गतिविधि का पता लगाकर ऑनलाइन सुरक्षा को भी मजबूत करता है। जिम्मेदार इंटरनेट उपयोग छात्रों के लिए एक सुरक्षित, अधिक लाभकारी डिजिटल भविष्य सुनिश्चित करता है।