Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आकाशातून पृथ्वी पाहणारे एआय : उपग्रहांचे जग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:39 IST2026-05-05T15:38:53+5:302026-05-05T15:39:42+5:30

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: ही माहिती इतकी मोठी असते की ती समजून घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या हुशार तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते.

lokmat ai series artificial intelligence watching earth from the sky the world of satellites | Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आकाशातून पृथ्वी पाहणारे एआय : उपग्रहांचे जग

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आकाशातून पृथ्वी पाहणारे एआय : उपग्रहांचे जग

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: रात्रीच्या आकाशात चमकणारे तारे पाहताना अनेकदा आपल्याला कुतूहल वाटते. पण, त्या आकाशात फक्त तारेच नसतात, तर पृथ्वीभोवती फिरणारे अनेक उपग्रह (Satellites) देखील असतात. हे उपग्रह जणू आकाशातील निरीक्षकासारखे काम करतात. ते समुद्र, पर्वत, जंगल, शहर आणि ढगांचे फोटो घेतात आणि ही माहिती पृथ्वीवर पाठवितात. ही माहिती इतकी मोठी असते की ती समजून घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या हुशार तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते.

उपग्रह म्हणजे काय?

उपग्रह म्हणजे पृथ्वीभोवती फिरणारे वैज्ञानिक उपकरण आहे. ते अवकाशातून पृथ्वीचे फोटो आणि माहिती गोळा करतात. भारताची भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation -ISRO) आणि जगातील अनेक संस्था असे उपग्रह अवकाशात पाठवितात. यालाच उपग्रह प्रणाली म्हणतात.

आपल्याला हवामानाचा अंदाज कसा समजतो?

उपग्रह ढगांची हालचाल आणि वातावरणातील बदल पाहतात. एआय या माहितीवरून पाऊस, वादळ किंवा चक्रीवादळ यांचा अंदाज लावते. त्यामुळे लोकांना आधीच सावध करता येते आणि नुकसान कमी करता येते.

पृथ्वीचे संरक्षण कसे होते ?

जंगलातील आग, झाडांची बेकायदेशीर तोड किंवा समुद्रातील प्रदूषण शोधण्यासाठी उपग्रह उपयोगी पडतात. एआय फोटोमधील बदल ओळखून वैज्ञानिकांना सूचना देते. त्यामुळे पर्यावरण जपण्यास मदत होते.

एआय कशी मदत करते?

उपग्रहांकडून दररोज हजारो फोटो आणि डेटा पृथ्वीवर येत असतात. एआय या माहितीचे विश्लेषण करुन त्यातील बदल आणि पॅटर्न ओळखते. त्यामुळे हवामानातील बदल किंवा नैसर्गिक घटनांची माहिती पटकन मिळते.

Moral Story

Satellites collect images of Earth from space. Artificial Intelligence studies these images to understand weather, track storms, and protect the environment. Science helps us understand our planet and protect it for the future.

उद्याचे विज्ञान

भविष्यात एआय आणि उपग्रह तंत्रज्ञान आणखी प्रगत होणार आहे.
हवामानाचा अंदाज अधिक अचूक होईल.
कदाचित उद्या शाळकरी मुलांपैकीच कोणी नवीन उपग्रह तयार करणारा वैज्ञानिक बनेल.

- इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)
 

Web Title : लोकमत एआई: अंतरिक्ष से पृथ्वी को देखते उपग्रह और कृत्रिम बुद्धिमत्ता

Web Summary : उपग्रह पृथ्वी का निरीक्षण करते हैं, जिससे एआई द्वारा विश्लेषणित डेटा मिलता है। यह मौसम का पूर्वानुमान लगाने, वनों की कटाई और प्रदूषण का पता लगाकर पर्यावरण की रक्षा करने और वैज्ञानिकों को हमारे बदलते ग्रह को समझने में मदद करता है। भविष्य में और सटीक भविष्यवाणियां होने की उम्मीद है।

Web Title : Lokmat AI: Satellites and Artificial Intelligence Exploring Earth from Space

Web Summary : Satellites observe Earth, providing data analyzed by AI. This helps predict weather, protect the environment by detecting deforestation and pollution, and aids scientists in understanding our changing planet. Future advancements promise more accurate predictions.