Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय शिक्षक: मुलांसाठी नवीन गुरु की शॉर्टकटचा धोका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 07:07 IST2026-05-18T07:07:07+5:302026-05-18T07:07:07+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय मुलांना खरंच शिकवत आहे का, की फक्त तयार उत्तरं देऊन त्यांना शॉर्टकटची सवय लावत आहे?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय शिक्षक: मुलांसाठी नवीन गुरु की शॉर्टकटचा धोका?
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आजच्या शाळकरी मुलांच्या आयुष्यात एक नवीन "गुरु" प्रवेश करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच एआय. गृहपाठ सोडवणं, प्रश्नांची उत्तरं देणं, निबंध लिहून देणं, अगदी चित्रसुद्धा काढून देणं. हे सगळं आता काही सेकंदांत शक्य झालं आहे. त्यामुळे अनेक मुलांना एआय हा एक जादुई मदतनीस वाटतो, पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. हा एआय मुलांना खरंच शिकवत आहे का, की फक्त तयार उत्तरं देऊन त्यांना शॉर्टकटची सवय लावत आहे?
शिकण्याची नवी पद्धत
एआयमुळे शिकण्याची पद्धत खूप बदलली आहे. एखादा विषय समजला नाही, तर मुलं लगेच एआयकडे विचारु शकतात.
कठीण गणिताचे प्रश्न सोप्या स्टेप्समध्ये समजतात, इंग्रजी शब्दांचा अर्थ लगेच मिळतो आणि नवीन गोष्टी जाणून घेणं सोपं होतं.
म्हणजेच, एआय हा मुलांसाठी २४ तास उपलब्ध असलेला "वैयक्तिक शिक्षक" बनत आहे.
विशेषतः ज्या मुलांना अतिरिक्त मार्गदर्शन मिळत नाही, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.
शॉर्टकटचा धोका -विचार करण्याची सवय कमी होते?
पण एआयचा वापर जर चुकीच्या पद्धतीने झाला, तर तो धोकादायकही ठरु शकतो.
अनेक मुलं स्वतः विचार करण्याऐवजी थेट उत्तर कॉपी करतात.
गृहपाठ समजून घेण्याऐवजी तो पूर्ण करण्यावर भर देतात.
यामुळे हळूहळू मुलांची विचार करण्याची क्षमता, कल्पनाशक्ती आणि मेहनतीची सवय कमी होऊ शकते.
शिकण्याऐवजी "तयार उत्तर मिळवणं हीच सवय झाली, तर भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
योग्य वापर कसा करायचा?
एआयला गुरु बनवा, आधार नाही, एआय टाळणं शक्य नाही, पण त्याचा योग्य वापर करून शिकणं खूप गरजेचं आहे. मुलांनी एआयचा वापर "उत्तर मिळविण्यासाठी" नाही, तर "समजून घेण्यासाठी" करायला हवा.
उदा. थेट उत्तर न घेता, "हे कसं सोडवायचं?" असा प्रश्न विचारणं, एखादा विषय समजून घेण्यासाठी मदत घेणं, स्वतः प्रयत्न केल्यानंतरच एआयचा वापर करणं, पालक आणि शिक्षकांनीही मुलांना याबाबत मार्गदर्शन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय याचे महत्त्व अधिक विद्यार्थ्यांना समजू शकत नाही.
Moral Story
Artificial Intelligence can be a powerful learning companion for children, but it should not replace thinking. When students depend too much on Al for ready-made answers, they may lose creativity and problem-solving skills. The key is to use Al as a guide, not as a shortcut. Use Al to learn better, not to think less.
भविष्यातील विद्यार्थी कसा असावा?
भविष्यात यशस्वी होणारा विद्यार्थी तोच असेल जो एआयचा वापर करेल, पण त्यावर अवलंबून राहणार नाही. जो स्वतः विचार करेल, प्रश्न विचारेल आणि नवीन गोष्टी शिकण्याची सवय ठेवेल. कारण एआय उत्तर देऊ शकतो, पण विचार करण्याची ताकद फक्त माणसातच असते.
- इंजि. अविनाश जाधव (एआय अँड टेक एज्युकेटर)