शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
4
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
5
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
6
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
7
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
8
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
9
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
10
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
11
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
12
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
13
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
14
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
15
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
16
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
17
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
18
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
19
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
20
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: विद्यार्थ्यांसाठी संधी की सावधगिरीचा इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 07:07 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: शिक्षण क्षेत्रात एआयचा वापर वाढत असताना, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयींमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवून आणत आहे. 'चॅटजीपीटी' सारखी एआय आधारित साधने विद्यार्थ्यांना संवादाच्या माध्यमातून शिकण्याची नवीन दिशा देत आहेत. ही साधने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तर देतात, कठीण विषय सोप्या भाषेत समजावतात आणि वैयक्तिक शिकण्याची संधीही निर्माण करतात. त्यामुळे पारंपरिक शिक्षणासोबत डिजिटल व स्मार्ट शिक्षणाचा समतोल साधला जात आहे. मात्र, या बदलत्या प्रवाहात विद्यार्थ्यांनी या साधनांचा योग्य वापर केला तरच त्याचा खरा फायदा मिळू शकतो.

शिक्षण क्षेत्रात एआयचा वापर वाढत असताना, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयींमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. पूर्वी तासन्तास पुस्तकं चाळून माहिती शोधावी लागायची; आता काही सेकंदांत संपूर्ण विषय डोळ्यासमोर एका क्लिकने समोर येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचतो आणि अधिक गोष्टी शिकण्याची संधी मिळते. विशेषतः ग्रामीण आणि मर्यादित साधनसामग्री असलेल्या भागातील विद्यार्थ्यांसाठी ही साधने एक मोठी संधी ठरत आहेत.

स्व-अभ्यासाची वाढती संधी 

आज शाळा-महाविद्यालयांत डिजिटल शिक्षणावर भर दिला जात आहे. मोबाइल, टॅबलेटच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतः शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. एआयमुळे स्व-अभ्यास ही संकल्पना अधिक मजबूत होत आहे. त्यामुळे विद्यार्थी फक्त परीक्षेसाठी नाही, तर खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी अभ्यास करू लागतात.

सर्जनशीलतेला चालना

एआय विद्यार्थ्यांना केवळ माहिती देत नाही तर त्यांना विचार करायला लावते. उदाहरणे, स्पष्टीकरणे आणि सराव प्रश्नांद्वारे शिकण्याची प्रक्रिया अधिक रंजक बनते.

निबंध लेखन, भाषण, प्रोजेक्ट्स

यामध्ये विद्यार्थ्यांची सर्जनशीलता वाढण्यास मदत होते. विद्यार्थी एआयच्या मदतीने इंग्रजीसारख्या भाषांमध्ये आत्मविश्वासाने लिहू लागलेत. इंग्रजी बोलू लागले आहेत. काही विद्यार्थी वेगवेगळे कोर्सेस आणि भाषा शिकताना दिसत आहेत.

विचारशक्तीवरील परिणाम

मात्र, या सर्व सकारात्मक बदलांसोबत काही गंभीर प्रश्नही निर्माण होत आहेत. सर्वांत मोठा धोका म्हणजे विद्यार्थ्यांची स्वतः विचार करण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शोध घेण्याची आणि मेहनत करण्याची सवय कमी होऊ शकते.

माहितीची अचूकता आणि गैरवापर

AI ने दिलेली माहिती नेहमीच अचूक असेल असे नाही. काही वेळा चुकीची किंवा अपूर्ण माहितीही मिळू शकते. परीक्षांमध्ये एआयचा गैरवापर होण्याची शक्यता देखील शिक्षण व्यवस्थेसाठी एक मोठे आव्हान बनत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठलीही माहिती ही अचूक आहे की नाही हे तपासून बघितले पाहिजे.

योग्य वापराची गरज

आजच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संतुलन राखणे. एआयचा वापर हा शिक्षक आणि पुस्तकांचा पर्याय म्हणून नाही, तर पूरक साधन म्हणून केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी एआयकडून मिळालेली माहिती समजून घेणे, पडताळून पाहणे आणि स्वतःच्या शब्दांत मांडणे ही सवय विकसित केली पाहिजे.

Artificial Intelligence is reshaping education by making learning faster, smarter, and more accessible. While tools like ChatGPT empower students with instant knowledge and creativity, overdependence can weaken critical thinking. The real success lies in using Al as a guide, not a replacement.

Moral: Balance between technology and thinking is the key to true learning.

भविष्यासाठीची आपली तयारी

तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकवणे ही आजच्या शिक्षणाची गरज बनली आहे. शाळांनी विद्यार्थ्यांना AI चा जबाबदारीने वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. भविष्यात 'एआय साक्षरता' ही एक महत्त्वाची कौशल्य ठरणार आहे.

- इंजि. अविनाश जाधव (एआय अँड टेक एज्युकेटर)

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat AI: Opportunity or Cautionary Tale for Students?

Web Summary : AI transforms education, offering personalized learning but potentially hindering critical thinking. Balanced usage is key. Students must verify information and use AI responsibly as a learning aid, not a replacement, to prepare for the future.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमतtechnologyतंत्रज्ञानEducationशिक्षणStudentविद्यार्थीStudentविद्यार्थी