भारतातील ऊर्जा क्षेत्राला नवी गती मिळणार, 'लॉरिट्स क्नुडसेन'चे अत्याधुनिक तंत्रज्ञान लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:41 IST2026-05-09T12:39:56+5:302026-05-09T12:41:02+5:30
भारताच्या ऊर्जा क्षेत्राला नवी गती मिळण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात आता 'लॉरिट्स क्नुडसेन' कंपनीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

भारतातील ऊर्जा क्षेत्राला नवी गती मिळणार, 'लॉरिट्स क्नुडसेन'चे अत्याधुनिक तंत्रज्ञान लॉन्च
भारताच्या ऊर्जा क्षेत्राला नवी गती मिळण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात आता 'लॉरिट्स क्नुडसेन' कंपनीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. देशातील ऊर्जा क्षेत्रातील मागणी आणि सक्षम यंत्रणेची गरज लक्षात घेत कंपनीनं विविध उद्योगांसाठी १० अत्याधुनिक ऊर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशन सोल्यूशन लॉन्च केले आहेत. मुंबईतील बीकेसी येथे नुकतेच कंपनीचा कार्यक्रम पार पडला. ज्यात १००० हून अधिक ग्राहक, भागीदार, सल्ला आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांसाठी लाइव्ह प्रात्यक्षिक आणि टेक्निकल सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
लो-व्होल्टेज स्विचगियर, ऊर्जा व्यवस्थापन सोल्यूशन्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि स्मार्ट होम सोल्यूशन्ससह ३०० हून अधिक उत्पादनांची माहिती यात देण्यात आली. भारताची औद्योगिक आणि ऊर्जा संक्रमणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मेड-इन-इंडिया व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक तंत्रज्ञान देण्याच्या दृष्टीने लॉरिट्झ क्नुडसेन कंपनीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोर्टफोलिओ प्रदर्शनाचा भाग म्हणून १० हून अधिक नेक्स्ट-जनरेशन इनोव्हेशन्सच्या लाँचची घोषणा केली. 'पॉवरिंग अ नॉन-स्टॉप इंडिया' अंतर्गत कंपनीने विविध उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये स्थिर, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज ऊर्जा परिसंस्था विकसित करत आहे. ही सर्व सोल्यूशन्स कामकाज विनासायास, सुरक्षित आणि शाश्वत ठेवण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.
"भारताच्या विकासाची गाथा स्थिर, बुद्धिमान आणि भविष्यासाठी सज्ज ऊर्जा पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या क्षमतेवर आधारलेली आहे. लॉरिट्झ क्नुडसेन या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आम्ही अशी सोल्यूशन्स उपलब्ध करून देत आहोत, जी जागतिक मानकांनुसार असण्यासह भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजांशी खोलवर जोडलेली आहेत. आम्ही भारतासोबत मोठे झालो आहोत, भारताकडून शिकलो आहोत, उत्पादनेही भारतातच तयार केली आहेत. आता आम्ही अशा विश्वसनीय, कार्यक्षम आणि शाश्वत ऊर्जा यंत्रणा सुनिश्चित करत आहोत, ज्या देशाच्या विकासाच्या पुढच्या टप्प्याला बळ देतील आणि या माध्यमातून आम्ही नव्या भारताची उभारणी करत आहोत."
- दीपक शर्मा,ग्रेटर इंडियाचे झोन प्रेसिडेंट