Republic Day Sale 2026: जबरदस्त ऑफर! फक्त १ रुपया देऊन घरी आणा टीव्ही, फ्रिज, एसी आणि इतर अनेक वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:30 IST2026-01-22T13:28:02+5:302026-01-22T13:30:06+5:30

Republic Day Sale Offers: वर्षातील सर्वात मोठी ऑफर! प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध होम प्रॉडक्ट निर्माता कंपनी हायरने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे.

Haier Republic Day Sale 2026: Shop ACs, TVs, and Refrigerators Starting at 1 Rs | Republic Day Sale 2026: जबरदस्त ऑफर! फक्त १ रुपया देऊन घरी आणा टीव्ही, फ्रिज, एसी आणि इतर अनेक वस्तू

Republic Day Sale 2026: जबरदस्त ऑफर! फक्त १ रुपया देऊन घरी आणा टीव्ही, फ्रिज, एसी आणि इतर अनेक वस्तू

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध होम प्रॉडक्ट्स निर्माता कंपनी हायरने ग्राहकांसाठी खास ऑफर्सचा वर्षाव केला. या सेलमध्ये ग्राहक अवघ्या १ रुपयामध्ये एसी, टीव्ही आणि रेफ्रिजरेटर यांसारखी महागडी उपकरणे खरेदी करू शकणार आहेत. ही सवलत २२ ते ३१ जानेवारी दरम्यान उपलब्ध असणार आहे.

हायरने या विक्री हंगामात आपली सर्वात शक्तिशाली ऑफर लॉन्च केली आहे. '१ रुपया द्या, हायरला घरी घेऊन जा' या स्कीमअंतर्गत ग्राहक निवडक होम प्रॉडक्ट्स केवळ १ रुपया भरून खरेदी करू शकतात. उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा कंपनीने दिली. विशेष म्हणजे, या ईएमआय योजनांची सुरुवात अवघ्या ९९४ रुपयांपासून होत असून, ग्राहकांना २४ महिन्यांपर्यंतचा कालावधी मिळू शकतो.

केवळ १ रुपयाची ऑफरच नाही, तर कंपनीने इतरही अनेक आर्थिक फायद्यांची घोषणा केली आहे. एसी, टीव्ही आणि रेफ्रिजरेटरच्या खरेदीवर २५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. ईएमआयवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष सवलत दिली जात असून, त्यामुळे वस्तूंची एकूण किंमत कमी होणार आहे. शिवाय, नो-कॉस्ट ईएमआयसह हप्ते भरण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. 

या सेलमध्ये स्मार्ट एलईडी टीव्ही, विंडो आणि स्प्लिट एसी, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, रोबोट व्हॅक्यूम क्लीनर आणि मायक्रोवेव्ह ओव्हन यांसारख्या विविध वस्तूंचा समावेश आहे. यापैकी निवडक वस्तूंवर एक्सटेंड वॉरंटी मिळत आहे. हायरची ही प्रजासत्ताक दिन ऑफर मिळवण्यासाठी ग्राहकांनी सर्वात प्रथम हायरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. शिवाय, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर ई-कॉमर्स वेबसाइटवरूनही खरेदी करू शकतात.

Web Title : Haier का गणतंत्र दिवस ऑफर: टीवी, फ्रिज, एसी सिर्फ ₹1 में!

Web Summary : Haier गणतंत्र दिवस सेल में एसी, टीवी और फ्रिज सिर्फ ₹1 में दे रहा है। ग्राहक बाकी राशि किश्तों में चुका सकते हैं, ईएमआई ₹994 से शुरू होती है। Haier की वेबसाइट और ई-कॉमर्स प्लेटफॉर्म पर 25% तक कैशबैक और विस्तारित वारंटी भी उपलब्ध हैं।

Web Title : Haier Republic Day Offer: TV, Fridge, AC for Just ₹1!

Web Summary : Haier offers ACs, TVs, and refrigerators for just ₹1 during Republic Day sales. Customers can pay the balance in installments with EMIs starting from ₹994. Cashback up to 25% and extended warranties are also available on select products via Haier's website and e-commerce platforms.