भारीच! Facebook, Instagram, WhatsApp एकाच ठिकाणाहून होणार कंट्रोल; आलं 'हे' नवं फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 12:04 PM2023-01-21T12:04:16+5:302023-01-21T12:09:15+5:30

युजर्सना फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि WhatsApp सारख्या लोकप्रिय मेटा प्लॅटफॉर्मवर सेटिंग्ज बदलण्याचा पर्याय एकाच ठिकाणाहून मिळेल.

facebook instagram and whatsapp users can now bundle account settings with meta accounts center | भारीच! Facebook, Instagram, WhatsApp एकाच ठिकाणाहून होणार कंट्रोल; आलं 'हे' नवं फीचर

भारीच! Facebook, Instagram, WhatsApp एकाच ठिकाणाहून होणार कंट्रोल; आलं 'हे' नवं फीचर

Next

सोशल मीडिया कंपनी मेटा युजर्सना आपल्या वेगवेगळ्या सेवा एकाच वेळी उपलब्ध करून देणार आहे. युजर्सना फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि WhatsApp सारख्या लोकप्रिय मेटा प्लॅटफॉर्मवर सेटिंग्ज बदलण्याचा पर्याय एकाच ठिकाणाहून मिळेल आणि अनेक मेटा अकाऊंट एकमेकांशी जोडली जाऊ शकतात.

नवीन अपग्रेड युजर्ससाठी 20 जानेवारी पासून लागू झाले आहेत. लवकरच सर्व फेसबुक, मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि WhatsApp युजर्सना त्यांचे फायदे मिळतील आणि मेटाने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये याबद्दल माहिती दिली आहे. नवीन अकाउंट्स सेंटरमध्ये युजर्सना अतिरिक्त फीचर्सचा लाभ देखील मिळेल.

Meta च्या नवीन वैशिष्ट्यासह, Meta च्या इकोसिस्टमचा भाग असलेल्या आणि एकाधिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या युजर्ससाठी वर्क एक्सपीरियन्स सुधारेल. नवीन फीचरसह, युजर्सना एक सेंट्रलाइज्ड स्पेस मिळेल जिथून ते पासवर्ड, अकाऊंट सुरक्षा आणि सेटिंग्ज मॅनेज करण्याव्यतिरिक्त त्यांची वैयक्तिक माहिती मॅनेज करू शकतात.

नवीन मेटा फीचरचा वापर ऐच्छिक आहे, याचा अर्थ असा की जे युजर्स करू इच्छितात तेच अकाऊंट सेंटरशी अनेक अकाऊंट्स लिंक करू शकतील. त्याच वेळी, बाकीच्यांना पूर्वीप्रमाणे मेटा Apps  वापरण्याचा पर्याय मिळत राहील. उदाहरणार्थ, जर युजर्सना Facebook, Instagram आणि इतर मेटा प्लॅटफॉर्मवर दिसत असलेल्या जाहिराती मॅनेज करायच्या असतील, तर त्या एकाच ठिकाणाहून पर्सनलाइज केल्या जाऊ शकतात.

ब्लॉग पोस्टमध्ये असे म्हटले आहे की ज्या सेटिंग्ज एकत्रितपणे कंट्रोल केल्या जाऊ शकतात त्यामध्ये पर्सनल डीटेल्स, पासवर्ड अँड सिक्युरिटी, परवानग्या, एड प्रिफरेंसेज आणि पेमेंट संबंधित माहिती आणि सेटिंग्ज यांचा समावेश आहे. तथापि, पर्सनल एप्सशी संबंधित सेटिंग्ज अकाऊंट सेंटरचा भाग बनवला जाणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: facebook instagram and whatsapp users can now bundle account settings with meta accounts center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.