Apple चा सर्वात स्वस्त Laptop लॉन्च, भारतात याची किंमत किती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 11:41 IST2026-03-05T11:39:17+5:302026-03-05T11:41:16+5:30

Apple Cheapest Laptop Price: हा लॅपटॉप पूर्ण चार्ज केल्यानंतर 16 तासांपर्यंत व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि 11 तास वेब ब्राउझिंग करू शकतो.

Apple's cheapest laptop launched, how much does it cost in India? know | Apple चा सर्वात स्वस्त Laptop लॉन्च, भारतात याची किंमत किती? जाणून घ्या...

Apple चा सर्वात स्वस्त Laptop लॉन्च, भारतात याची किंमत किती? जाणून घ्या...

Apple Cheapest Laptop Price: दिग्गज टेक कंपनी Apple ने ग्राहकांसाठी नवीन बजेट-फ्रेंडली लॅपटॉप MacBook Neo लॉन्च केला आहे. 13-इंच Liquid Retina डिस्प्ले आणि A18 Pro चिपसेटसह येणारा हा लॅपटॉप कंपनीच्या किफायतशीर श्रेणीतील महत्त्वाचा पर्याय मानला जात आहे. विशेष म्हणजे हाच प्रोसेसर iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्येही वापरण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा लॅपटॉप एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 16 तासांपर्यंत व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि सुमारे 11 तास वेब ब्राउझिंग करू शकतो.

भारतातील किंमत 

नवीन MacBook Neo दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

8GB RAM + 256GB SSD : ₹69,900

8GB RAM + 512GB SSD : ₹79,900

हा लॅपटॉप Blush, Citrus, Indigo आणि Silver या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी कंपनीकडून ₹10,000 पर्यंत एज्युकेशन डिस्काउंट दिला जात आहे. सध्या या लॅपटॉपची प्री-बुकिंग सुरू असून, 11 मार्चपासून कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत रिटेल स्टोअर्समध्ये विक्री सुरू होणार आहे.

कोणत्या लॅपटॉप्सना देणार टक्कर?

Apple च्या या बजेट MacBook ची टक्कर मुख्यतः Chromebook लॅपटॉप्ससोबत असेल, जे ₹60,000 ते ₹70,000 किंमत श्रेणीतील Windows लॅपटॉप्स आहेत. याशिवाय, HP, Dell, Acer यांसारख्या ब्रँड्सनाही अॅपलचे आव्हान असेल.

MacBook Neo : प्रमुख स्पेसिफिकेशन्स

13-इंच Liquid Retina IPS डिस्प्ले

219ppi पिक्सेल डेंसिटी

A18 Pro चिपसेट

8GB RAM (अपग्रेडचा पर्याय नाही)

256GB / 512GB SSD स्टोरेज

Magic Keyboard आणि Multi-Touch Trackpad

Touch ID बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन

1080p FaceTime HD वेबकॅम

Dolby Atmos आणि Spatial Audio सपोर्ट

कनेक्टिव्हिटीसाठी:

Wi-Fi 6E

Bluetooth 6

USB-C पोर्ट (USB 3.0 + USB 2.0)

3.5mm हेडफोन जॅक

बॅटरी आणि वजन

या लॅपटॉपमध्ये 36.5Wh बॅटरी देण्यात आली आहे जी 20W USB-C अडॅप्टरद्वारे चार्ज होते. कंपनीच्या दाव्यानुसार हा लॅपटॉप 16 तास व्हिडिओ स्ट्रीमिंग, 11 तास वेब ब्राउझिंग देऊ शकतो. 

परफॉर्मन्सबाबत कंपनीचा दावा

Apple च्या म्हणण्यानुसार, A18 Pro चिप असलेला हा लॅपटॉप Intel Core Ultra 5 प्रोसेसर असलेल्या Windows PC पेक्षा साध्या कामांमध्ये 50% अधिक वेगवान आहे. तसेच काही AI-आधारित कामांमध्ये तीनपट जास्त परफॉर्मन्स देऊ शकतो.

Web Title : एप्पल का सबसे सस्ता लैपटॉप लॉन्च: भारत में कीमत का खुलासा!

Web Summary : एप्पल का बजट-अनुकूल लैपटॉप, मैकबुक नियो, में 13 इंच का लिक्विड रेटिना डिस्प्ले और ए18 प्रो चिप है। यह 16 घंटे तक वीडियो स्ट्रीमिंग और 11 घंटे तक वेब ब्राउजिंग प्रदान करता है। दो स्टोरेज विकल्पों में उपलब्ध, इसकी कीमत ₹69,900 से शुरू होती है, जो क्रोमबुक और विंडोज लैपटॉप को टक्कर देती है।

Web Title : Apple Launches Cheapest Laptop: Price in India Revealed!

Web Summary : Apple's MacBook Neo, a budget-friendly laptop, features a 13-inch Liquid Retina display and A18 Pro chip. It offers up to 16 hours of video streaming and 11 hours of web browsing. Available in two storage options, it starts at ₹69,900, challenging Chromebooks and Windows laptops.