शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी शंभूराजांचा आदर्श घ्यावा

By admin | Updated: May 20, 2014 01:00 IST

: गोसावी ‘मृत्युंजय संभाजी’ या विषयावर व्याख्यान, शिवगौरव पुरस्कारांचे वितरण

बार्शी : छत्रपती शंभूराजे हे ज्ञानी व महापराक्रमी राजे होते, परंतु त्यांचा खरा इतिहास जगासमोर कधीच आला नाही. छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी जगावे कसे हे शिकविले तर शंभूराजांनी स्वराज्या साठी कसे मरावे हे शिकविले. आयुष्यात जीवनाची खरी मूल्ये जाणून घ्यायची असतील तर युवकांनी या महापुरुषांचे जीवनचरित्र अभ्यासावे व त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन मातापित्यांसाठी सर्वस्व जीवन अर्पित करावे, असे मत शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले. छत्रपती शंभूराजे यांच्या जयंतीनिमित्त येथील शिवराज्य सेनेच्यावतीने ‘मृत्युंजय संभाजी’ या विषयावर आयोजित व्याखानात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, रावसाहेब मनगिरे, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण करंजकर, नगरसेवक दीपक राऊत, शिरीष जाधव, शिवराज्य सेनेचे हर्षवर्धन पाटील, युवराज ढगे, प्रीतम मोरे, उमेश काळे, काका फुरडे, रामचंद्र इकारे, माजी नगराध्यक्ष पारखे कुर्डूवाडी, अ‍ॅड. राजश्री डमरे उपस्थित होते. यावेळी गोसावी यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वशैली व पहाडी आवाजाने शंभूराजेंचा धगधगता इतिहास सांगत रोमांच उभे केले व संपूर्ण जीवनपट उलगडून दाखविला. छत्रपती शिवाजीराजे अन् छत्रपती धर्मवीर शंभूराजे या पितापुत्राच्या नात्यामध्ये युद्धकाळात विविध प्रसंगात उभे राहिलेले नाजूक हृदयस्पर्शी भावबंध हळुवारपणे उलगडून दाखविले. शंभूचरित्र उलगडत असताना त्यांनी सद्यपरिस्थितीशी संदर्भ जोडत चंगळवाद, भोगवादाकडे वळत असलेल्या तरुणाईला चांगल्या आदर्शांची पायवाट चोखाळण्याचा संदेश दिला तर पालकांना पाल्यांवर चांगले संस्कार करा, असे सांगत शिवराज्य सेनेतील तरुण शिवशभूंचा आदर्श घेऊन सामाजिक कार्य करीत आहेत अशा चांगल्या गोष्टींचे अनुकरण करा, असा सल्ला दिला.