शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात दगड घालून महिलेचा खून

By admin | Updated: May 19, 2014 00:05 IST

सांगोला : अज्ञात कारणावरुन अज्ञात इसमाने घरासमोर गाढ झोपेत असलेल्या विधवा महिलेच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला.

 

सांगोला : अज्ञात कारणावरुन अज्ञात इसमाने घरासमोर गाढ झोपेत असलेल्या विधवा महिलेच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास खिलारवाडी-खोरेमळा (ता. सांगोला) येथे घडली. आशाबाई शरद खांडेकर (वय ३२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आशाबाई आपल्या चार मुला-मुलींसमवेत खोरेमळा याठिकाणी राहत होती. शनिवारी नेहमीप्रमाणे आशाबाई खांडेकर हिने जेवण उरकले व घरासमोर मुलांसमवेत झोपली होती. दरम्यान मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मोठा मुलगा नीलेश हा चुलत्यासमवेत विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी शेतात गेला होता. तुषार हा लघुशंकेसाठी उठला असता त्याने आई आई म्हणून आशाबाईस उठविण्याचा प्रयत्न केला असता ती उठत नसल्याने तुषारने बहीण प्राजक्तास उठविले. मात्र बहिणीच्या आवाजालाही आईने प्रतिसाद दिला नाही. तुषार व प्राजक्ताने जवळच राहणार्‍या आजी सुशीला खांडेकर हिच्याकडे जाऊन आमची आई झोपीतून उठत नसल्याचे सांगितले. यावेळी सासू सुशीला हिने नातवांसमवेत येऊन सून आशाबाईस उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव सुरू होता़ बाजूला दगडही पडल्याचे निदर्शनास आले. यावेळी सासूनेच आरडाओरड केल्यामुळे सून आशाबाई हिचा खून झाल्याचे लोकांना समजले. याबाबत भारत कुबेर खांडेकर (रा. खिलारवाडी) याने पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

----------------------------

आशाबाई खांडेकर हिचा निर्घृण खून कोणत्या कारणावरून झाला, याचा तपास सुरु असून या खुनात बाहेरील व्यक्ती नसावी असा पोलिसांचा संशय आहे. त्या अनुषंगाने सर्व बाबी गृहीत धरुन लवकरच या खुनाचा छडा लावला जाईल. - दयानंद गावडे पोलीस निरीक्षक, सांगोला