शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला घरी जायचंय... खूप तणावात आलो आहोत आम्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 15:52 IST

परभणीच्या विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा; आई-वडील दररोज करीत आहेत फोन

ठळक मुद्देदहावीच्या परीक्षेला आम्ही सोलापूरच्या आश्रमशाळेतून फॉर्म भरला होतापरीक्षा देण्यासाठी विद्यार्थी २७५ कि.मी. अंतरावरून सोलापुरात आले होतेएस.टी. व रेल्वे दोन्ही सेवा बंद झाल्याने विद्यार्थी आश्रमशाळेत अडकले

सोलापूर : दहावीच्या परीक्षेला आम्ही सोलापूरच्या आश्रमशाळेतून फॉर्म भरला होता. परीक्षा सुरू असताना अचानक लॉकडाऊन झाला, आज आम्ही शिक्षकाच्या घरी आहोत. आम्ही खूप तणावात आलो आहोत, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. 

परभणी येथील रहिवासी असलेल्या तीन विद्यार्थ्यांनी सोलापुरातील केंद्रीय निवासी माध्यमिक विद्यालय भाटेवाडी, डोणगाव, उत्तर सोलापूर येथून दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरला होता. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी २७५ कि.मी. अंतरावरून सोलापुरात आले होते. दि.२२ मार्चपासून परीक्षेला सुरुवात झाली होती. दि.२२ मार्च रोजी देशभरात जनतेचा कर्फ्यू पुकारण्यात आला होता; मात्र अचानक देशात व राज्यात दि.२२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्याने त्यांचा दि.२३ मार्च रोजी होणारा शेवटचा पेपर रद्द झाला. मात्र एस.टी. व रेल्वे दोन्ही सेवा बंद झाल्याने विद्यार्थी आश्रमशाळेत अडकले. शाळेत विद्यार्थी ठेवता येत नसल्याने परभणीतील पाच विद्यार्थ्यांना डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे राहणारे शिक्षक गणेश भगत यांच्या घरी ठेवण्यात आले आहे. 

प्रेम पंढरीनाथ गायकवाड (वय २०, रा. परसावत नगर, जि. परभणी), राधिका प्रल्हाद रणखांब (वय १८), ओम प्रल्हाद रणखांब (वय २१ दोघे रा. मु.पो. बामणी ता. जिंतूर जि. परभणी) हे विद्यार्थी सध्या सोलापुरात अडकले आहेत. तिघांचे आई-वडील शेतमजूर असून, परिस्थितीमुळे शिकता येत नाही. 

सोलापुरातील केंद्रीय आश्रमशाळेतून तिघांना फॉर्म भरला आहे. घरी बसून अभ्यास केल्यानंतर ते परीक्षेसाठी सोलापुरात आले होते. मुले अजून घरी न आल्याने आई,वडील चिंता करीत आहेत. आम्ही किती दिवस राहायचं आणि काय खायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून मुले आमच्या घरी वास्तव्यास आहेत. त्यांच्या आई-वडिलांचा सारखा फोन येत आहे; मात्र येथून त्यांना पाठवायचं कसं हा प्रश्न पडला आहे. शासनाकडून काही विशेष बाब म्हणून सोय करण्यात यावी अशी आमची इच्छा आहे. - गणेश भगत, शिक्षक, केंद्रीय निवासी माध्यमिक विद्यालय, भाटेवाडी, डोणगाव, उत्तर सोलापूर. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSchoolशाळाEducationशिक्षण