शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

उजनी धरणातील पाण्यात दररोज एक टक्का होतेय घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 2:23 PM

गत मार्चमध्ये प्लस ५५ टक्के असलेल्या उजनीत आता वजा ११ टक्के पाणी 

ठळक मुद्देगेल्या वर्षी योग्य नियोजन झाल्यामुळे पाणीसाठा भरपूर शिल्लकचालू वर्षी सप्टेंबरमध्ये ११० टक्के भरलेले धरण मार्चमध्ये मायनसमध्ये गेलेजवळपास तीन ते चार टीएमसी पाणी येणाºया काळात बाष्पीभवनामुळे कमी होणार

भीमानगर : उजनी धरणाची गेल्या वर्षाच्या तुलनेत कमालीची पाणीपातळी घटली आहे. बुधवारी उजनीची एकूण पाणीपातळी ४९०.११० मीटर आहे, तर एकूण पाणीसाठा मायनस १६२८.८४ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठा मायनस १७३.९७ दलघमी आहे. उजनी धरणाची टक्केवारी मायनस ११.४७ टक्के असून, गेल्यावर्षी आजच्या दिवशी धरणात प्लस ५५.८५ टक्के पाणीसाठा होता. 

गेल्या वर्षी योग्य नियोजन झाल्यामुळे पाणीसाठा भरपूर शिल्लक होता. परंतु चालू वर्षी सप्टेंबरमध्ये ११० टक्के भरलेले धरण मार्चमध्ये मायनसमध्ये गेले. म्हणजेच पाण्याचा भरपूर अपव्यय झाला आहे. याचा परिणाम येणाºया एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत जाणवणार आहे. अशात उष्णता भरपूर असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढणार आहे.

जवळपास तीन ते चार टीएमसी पाणी येणाºया काळात बाष्पीभवनामुळे कमी होणार आहे. त्यातच सोलापूर पाणीपुरवठा योजना, एनटीपीसी व बारामती एमआयडीसी या सगळ्या योजनांबरोबरच अनेक उपसा सिंचन योजनांना पाणी सुरूच राहणार आहे. त्यामुळे धरणातील पाणी उपसा बेसुमार सुरू आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील शेती उत्पादनावर होणार असून, वीज कपात अशा संकटाला शेतकºयांना सामोरे जावे लागणार आहे. यातून लाखो रुपयांचे नुकसान शेतकºयांना सोसावे लागणार आहे.

नदीला सात हजार शंभर क्युसेकने पाणी सोडले आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील शेतीचा वीजपुरवठा खंडित केला असून, पुणे जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतकºयांवर अन्याय का, असा सवाल शेतकरी आता करू लागला आहे. पुणे जिल्ह्याला वेगळा न्याय व सोलापूर जिल्ह्याला वेगळा न्याय का, असे सवाल उपस्थित होत आहेत.

रोज एक टक्का पाणी घटतेय !- उजनीतून भीमा नदीला ७,१०० क्युसेक तर कालव्याला २,९५० क्युसेक, बोगदा ५२० क्युसेक असे १०,५२० क्युसेक पाणी सोडल्याने रोज एक टक्का पाणी कमी होत आहे. सोलापूर, पंढरपूर अशा मोठ्या शहरांना जल संकटाचा सामना करावा लागणार असून, येणाºया काळात शेतीबरोबरच शहरांनासुद्धा पाण्याचे संकट बसणार आहे. उद्योगांवरसुद्धा याचा परिणाम दिसून येणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाई