शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

गुन्हेगारी नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : अंकुश शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 2:21 PM

हैद्राबाद व लंडनमध्ये खूप शिकायला मिळाल्याची भावना सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी केली व्यक्त

ठळक मुद्देशहरातील मुख्य चौक, प्रमुख रस्ते, गजबजलेल्या बाजारपेठा आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे - अंकुश शिंदेरात्री-अपरात्री सार्वजनिक रस्त्याच्या कडेला, चौकात बसून गप्पा मारणारे व हुल्लडबाजी करणाºयांवर कारवाई केली जाईल - अंकुश शिंदे शहराच्या पोलिसिंगमध्ये आधुनिकता आणण्याचे प्रयत्न करू - अंकुश शिंदे

सोलापूर : लंडन येथील आठ दिवसांच्या ट्रेनिंगदरम्यान खूप काही शिकायला मिळाले, तेथील पोलिसिंग जवळून पाहावयास मिळाली. प्रशिक्षणात जाणून घेतलेल्या काही गोष्टी सोलापुरात केल्या जातील. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा होईल याचा प्रयत्न राहील, असे मत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. 

सोलापूर शहर पोलीस आयुक्ताचा पदभार घेतल्यानंतर काही दिवसांतच अंकुश शिंदे हे गृहमंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणासाठी गेले होते. महिनाभर चाललेल्या प्रशिक्षणात ते १५ दिवस हैदराबाद येथे होते. आठ दिवस लंडन येथे गेले होते. लंडनमध्ये तेथील गुन्हेगारीचे स्वरूप, पोलिसिंग पद्धत, तपास यंत्रणा आदी विविध गोष्टींचा जवळून अभ्यास केला. लंडन येथील ट्रेनिंगचा फायदा सोलापूरच्या पोलिसिंगसाठी कसा करता येईल, याचा विचार करीत आहे. शहरातील घरफोड्या, चोºया, चेन स्नॅचिंग आणि मारामारीसारखे गुन्हे रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, याची माहिती घेत आहे. 

शहरातील मुख्य चौक, प्रमुख रस्ते, गजबजलेल्या बाजारपेठा आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कसे बसविता येतील, अस्तित्वात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांची स्थिती काय आहे, हे पाहून शहरातील दिवसभराच्या हालचाली आयुक्तालयात बसून पाहता येतील, अशी व्यवस्था करणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे नियोजन करता येते का, याची माहिती घेऊ. शहराच्या पोलिसिंगमध्ये आधुनिकता आणण्याचे प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

रात्रगस्त वाढविणार- शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रात्रीची गस्त वाढविली जाईल. रात्री-अपरात्री सार्वजनिक रस्त्याच्या कडेला, चौकात बसून गप्पा मारणारे व हुल्लडबाजी करणाºयांवर कारवाई केली जाईल. रात्री फटाके फोडणे, रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे आदींसारख्या बेशिस्त वर्तनावर पोलिसांचे लक्ष राहील. नियम सर्वांसाठी सारखे आहेत, नागरिकांनी त्याचे पालन करावे. स्वत:ला एक शिस्त घालून घ्यावी. गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही. पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी आहेत, ते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतील. जनतेमधूनही तितकाच प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे, असेही यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसhyderabad-pcहैदराबादPoliceपोलिस