शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’प्रकरणी संजय जाधववर अखेर निलंबनाची कारवाई; आणखी कोणाचा सहभाग, चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 08:44 IST

न्यायालयाकडून २ जुलैपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावलेली आहे.

कुर्डूवाडी : ‘नीट’च्या घोटाळ्यात लातूर पोलिसांकडून अटक करण्यात आलेला टाकळी (टें.)(ता. माढा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उपशिक्षक संजय तुकाराम जाधव याला अखेर गुरुवारी सायंकाळी जिल्हा परिषदेकडून निलंबित करण्यात आले. बुधवारी सायंकाळी लातूर पोलिसांकडून त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक केल्याचे पत्र जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना मिळाले. त्यानुसार गुरुवारी त्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे अहवाल सादर केला, त्यानंतर ही कारवाई झाली.

गुरुवारी शिक्षण विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे नीट प्रकरणातील आरोपी उपशिक्षक जाधव याच्याविषयी अहवालासह फाइल कारवाईसाठी सादर करण्यात आली; परंतु राज्यात अधिवेशन सुरू असल्याने तो प्रश्न अधिवेशनात तारांकित होण्याची शक्यता असल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत सायंकाळी उशिरापर्यंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सुनावणी घेऊन शेवटी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

अन् कारवाईची प्रक्रिया पूर्णनीट परीक्षेत विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्याचे आमिष देऊन पोलिसांच्या प्रथमदर्शनी १४ जणांकडून ॲडव्हान्सपोटी ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी लातूर पोलिसांत त्याच्यावर रविवारी सायंकाळी एटीएस पथकाकडून गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी त्याला लागलीच ताब्यात घेऊन तेथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाकडून २ जुलैपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावलेली आहे. याबाबत लातूर पोलिसांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना बुधवारी सायंकाळी पत्राद्वारे कळवले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र