शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: May 21, 2014 01:08 IST

संघर्ष समिती : लढा आणखी तीव्र करणार

दक्षिण सोलापूर: सीना नदीत उजनीतील पाणी सोडून १६ बंधारे भरुन घेण्याच्या मागणीसाठी सीना नदी पाणी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आवारात आणि जलसंपदा विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यापूर्वी ३ एप्रिल रोजी सोडलेले पाणी आठवडाभरात संपल्याने सीना नदीकाठचे बंधारे कोरडे पडले आहेत. सध्या पिके करपत असल्याने संतप्त शेतकर्‍यांनी रस्त्यावर येण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठचे शेतकरी वडकबाळ येथे एकत्र आले. त्यांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविला. विलास लोकरे, शिवानंद वरशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमध्ये ठिय्या मांडला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार तेथे आले आणि त्यांनी पाठिंब्यासाठी पोर्चमध्ये ठिय्या मारला. तासाभराने शेतकरी जलसंपदा कार्यालयाकडे गेले. अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांच्या दालनासमोर ठिय्या मारला. यावेळी अक्कलकोटचे आमदार सिद्रामप्पा पाटील तेथे धावून आले. त्यांनी शेतकर्‍यांशी चर्चा केली. जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्याशी मोबाईलवरुन स्थितीची माहिती दिली आणि सीनेत पाणी सोडण्याची मागणी केली. अधिकार्‍यांशी चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.