शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिरापूर गावाने जपली स्मृतिशिल्पे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 13:20 IST

मंदिर, मूर्तीचे जतन : वीरगती प्राप्त झालेल्यांचे सापडले शिल्प

ठळक मुद्देआधुनिक काळातदेखील वीरगळसारख्या दगडी स्मृतिशिल्पातून तर काही ठिकाणी मंदिर व मूर्तीमधून जतनशिरापूर (मो) येथील हनुमान मंदिरासमोर मात्र ग्रामस्थांनी ही स्मृतिशिल्पे, वीरगळ जतन करून ठेवलीशिरापूर (मो) हे गाव सीना नदीच्या काठी वसले असून, येथील वीरगळ व परिसरातील काही समाधी स्थळाचा अभ्यास

वडवळ : प्रत्येक गावाचे वैशिष्ट्य, इतिहास वेगळा असतो. आपल्या पूर्वजांनी भौतिक साधनांचा वापर करून मंदिर, स्मृतिशिल्पे उभारून हा इतिहास शब्दबद्ध करून ऐतिहासिक वारसा जतन केला आहे. 

आज आधुनिक काळातदेखील वीरगळसारख्या दगडी स्मृतिशिल्पातून तर काही ठिकाणी मंदिर व मूर्तीमधून जतन आहेत. मोहोळ तालुक्यातील शिरापूर (मो) येथील हनुमान मंदिरासमोर मात्र ग्रामस्थांनी ही स्मृतिशिल्पे, वीरगळ जतन करून ठेवली आहेत. त्यावर इतिहास कोरला गेलेला आहे. मंदिराच्या समोर वीरगळ आहे, यावर तीन चौकटीत विविध प्रसंग कोरलेले आहेत. घोड्यावर बसून युद्ध सुरू असल्याचा प्रसंग असून, या लढाईत वीरगती प्राप्त झालेल्या गावातील शूरवीरांचे शिल्प आहे. शिरापूर (मो) हे गाव सीना नदीच्या काठी वसले असून, येथील वीरगळ व परिसरातील काही समाधी स्थळाचा अभ्यास केला तर नव्याने इतिहासावर प्रकाश पडू शकतो. 

 आपल्या भागातील प्राचीन वारसा स्थळाविषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती होईल अन् त्याविषयी आदर निर्माण होऊन ही स्मृतिशिल्पे जपण्याचा प्रयत्न व्हावा, हा याचा मुख्य उद्देश आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे गरजेचे आहे. - नितीन अणवेकर, वीरगळ, शिलालेख अभ्यासक, सोलापूर

आमचे गाव धार्मिक परंपरा जपणारे आहे, त्यामुळे पूर्वजांनी सांगितल्यानुसार अनेक प्रथा आम्ही पाळत आहोत, आम्हाला नेमका इतिहास स्पष्टपणे माहीत नसला तरी आम्ही ही शिल्पे आजही जतन केली आहेत. - राजाराम जावळे, ग्रामस्थ शिरापूर (मो)

टॅग्स :SolapurसोलापूरhistoryइतिहासTempleमंदिर