सोलापूर : सोमवारी दुपारी सुटलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने मामाकडे आलेल्या एका शाळकरी मुलाचा बळी घेतला. वादळाच्या झोताने नवीन बांधकाम सुरू असलेली भिंत अंगावर कोसळल्याने मुलगा ठार झाल्याची घटना अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगरात घडली. गणेश संजय कट्टीमनी (वय १२, रा. गणेशनगर, भवानीपेठ सोलापूर) असे मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. तो तीन दिवसांपूर्वी मल्लिकार्जुन नगरात राहणारे मामा कैलास साखरे यांच्याकडे आला होता. मामा कामावर निघून गेल्यावर गणेश हा दुपारी पावणेचार वाजता मल्लिकार्जुन नगरातील मैदानात शौचास गेला होता. त्यावेळी हा प्रकार घडला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}