शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
2
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
3
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
4
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
5
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
6
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
7
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
8
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
9
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
10
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
11
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
12
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
13
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
14
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
15
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
16
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
17
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
18
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
19
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
20
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला अटक करण्यास गेलेल्या पोलिसांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 17:01 IST

सांगोल्यातील घटना : सहा जणांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देसांगोला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातील आरोपी कुमार आनंदा मेटकरी याच्या नावे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. न्यायालयाकडील वॉरंट बजावून आरोपीस अटक करण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाºयांना आरोपीच्या नातेवाईकांनी पकडून, शिवीगाळ, दमदाटीसह धक्काबुक्की करून आरोपीला पळून जाण्यास मदत केली

सांगोला : न्यायालयाकडील वॉरंट बजावून आरोपीस अटक करण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाºयांना आरोपीच्या नातेवाईकांनी पकडून, शिवीगाळ, दमदाटीसह धक्काबुक्की करून आरोपीला पळून जाण्यास मदत केली. या प्रसंगाचे चित्रीकरण करणाºया पोलिसाच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन फेकून दिल्याने दोन हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना २६ रोजी सकाळी मेटकर वस्ती येथे घडली. या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल वैजिनाथ कुंभार यांच्या छातीवर व उजव्या हाताच्या करंगळीला जखम झाली असून, डोक्यास मुक्का मार लागला आहे.

आनंदा बापू मेटकरी, पारुबाई आनंदा मेटकरी, कांचन कुमार मेटकरी, तानाजी आनंदा मेटकरी, कुमार आनंदा मेटकरी व पप्पू नावाची व्यक्ती (सर्व रा. मेटकर वस्ती, ता़ सांगोला) या सर्वांनी शासकीय कामात अडथळा आणून वॉरंटमधील आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे़

सांगोला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातील आरोपी कुमार आनंदा मेटकरी याच्या नावे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. या वॉरंटची तारीख २६ जुलै असल्याने न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्या आरोपीस पकडून शुक्रवारी सकाळी १० वाजता न्यायालयात हजर करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल वैजिनाथ कुंभार व पोलीस नाईक संजय पवार  आरोपीच्या वस्तीजवळ गेल्यानंतर तुझ्यावर अजामीनपात्र वॉरंट असून, तुला आमच्या सोबत यावे लागेल. असे सांगताच त्याने वॉरंट दाखवा, असे सांगितले. 

वॉरंट काढत असताना दुचाकी जागेवर सोडून तो पळून जाऊ लागला़ तेव्हा पोलीस कॉन्स्टेबल कुंभार व पोलीस नाईक पवार हे दोघे त्याचा पाठलाग करू लागले. यावेळी पोलिसांना धरा सोडू नका, असे म्हणताच महिला व पुरुषांनी पोलिसांना घट्ट पकडून जागेवरच उभे केल्याने पोलीस हतबल झाले. यावेळी वडील आनंदा मेटकरी यांनी  शिवीगाळ केली. यावेळी तानाजी मेटकरी याने पोलीस कॉन्स्टेबल कुंभार यांना धरून धक्काबुक्की केल्याने उजव्या हाताच्या करंगळीजवळ बोटास व छातीवर किरकोळ दुखापत तर डोकीला मागील बाजूस मुक्का मार लागला. 

यावेळी पोलीस नाईक संजय पवार घडत असलेल्या प्रसंगाचे मोबाईलवरून चित्रीकरण करत असल्याचे पाहून महिलांनी त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन फेकून दिल्याने मोबाईलचा डिस्प्ले फुटून नुकसान झाले.  पोलीस वैजिनाथ संदिपान कुंभार यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी कुमार आनंदा मेटकरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस