शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

काम सोडल्याच्या कारणावरून ऑर्कीस्ट्रा बारच्या गायिकेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 21:06 IST

सोलापुरातील शिवाजीनगर येथील घटना; फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मालकीणसह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्दे- मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- तू कामावर का येत नाहीस म्हणून केली मारहाण- गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचा तपास सुरू

सोलापूर : काम सोडल्याच्या कारणावरून गायिकेला मारहाण केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकीणसह तिघांविरूद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही मारहाण शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता शिवाजीनगर येथे झाली. 

मालकीण माधोबी, मुलगी परी, पिहु (सर्व रा. फावडे बिल्डिंग शिवाजी नगर, बाळे, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पुजाकुमारी ढोरासहाणी (वय २३, रा. नौतन जगदीशपूर, चंपारण बिहाऱ सध्या शिवाजीनगर बाळे) ही गायिका कोंडी येथील हॉटेल गॅलेक्सी आॅर्केस्ट्रा बारमध्ये कामाला होती. हॉटेल मालकीणसह सर्वजण बाळे येथील फावडे बिल्डिंगमध्ये भाड्याने राहतात. पुजाकुमारी ढोरासहाणी या ऑर्कीस्ट्रा बारमध्ये गायक म्हणून कामाला होत्या. जून २0१९ मध्ये पुजाकुमारी ढोरासहाणी यांनी काही कारणास्तव ऑर्कीस्ट्रा बारमधील काम सोडले होते. काम सोडल्यामुळे मालकीण माधोबी ही त्यांच्यावर चिडून होती. शिवाजीनगर येथे एकाच ठिकाणी सर्वजण रहात असल्याने माधोबी ही पुजाकुमारी ढोरासहाणी यांना टोमणे मारत होती. तू पुन्हा कामाला ये अशी दमदाटी करीत होती.

पुजाकुमारी ढोरासहाणी ही सिंगापूर येथे जाण्याच्या तयारीत होती. हा प्रकार माधोबी हिच्या लक्षात आला होता त्यावेळी ती आपल्या मुलांसमवेत शुक्रवारी सायंकाळी पुजाकुमारी यांच्या घरात गेली. तू कामावर का येत नाही असा जाब विचारत मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाणीत पुजाकुमारी ढोरासहाणी जखमी झाली. या प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस नाईक पोळ करीत आहेत. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी