शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

नावात साम्य असलेला अस्थिकलश बदलला; वाद गेला पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 14:49 IST

सोलापुरातील शिवधाम स्मशानभूमीतील प्रकार: पुन्हा अस्थी गोळा करून केले विसर्जन

ठळक मुद्देनावात साम्य असल्याने अस्थिकलश घेऊन जाण्यात गल्लत झाली हरकत घेतलेल्या नातेवाईकांना त्यांच्या व्यक्तीचा पुन्हा दुसरा अस्थिकलश तयार करून देण्यात आला या बाबत नातेवाईकांनी तक्रार दिली नाही. वाद मिटला असून दोन्ही नातेवाईकांचे समाधान झाले

संताजी शिंदे

सोलापूर : अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमीतील एका खोलीत ठेवण्यात आलेला अस्थिकलश बदलल्याने नातेवाईकांनी गोंधळ घातला. नावात साम्य असल्याने निर्माण झालेला वाद पोलीस ठाण्यात गेला. पुन्हा त्याच व्यक्तीच्या दुसºया अस्थी गोळा करून दिल्याने वाद मिटला अन् नातेवाईकांनी त्याचे भीमा नदीत विसर्जन केले. अक्कलकोट रोड सार्वजनिक सुधारणा समिती शिवधाम येथे हा प्रकार घडला. 

शिवधाम स्मशानभूमीत दि. ३१ आॅक्टोबर व १ सप्टेंबर २0१९ रोजी श्रीनिवास नावाच्या दोन व्यक्तींचा अंत्यविधी करण्यात आला होता. परंपरेप्रमाणे या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर दुसºया दिवशी माती सावडण्यात आली. अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावाचे अस्थिकलश तयार करून ते स्मशानभूमीतील एका खोलीत लोखंडी अँगलला बांधून ठेवण्यात आले. दहा दिवसानंतर श्रीनिवास नावाचा अस्थिकलश रविवारी संबंधित नातेवाईकांनी नेला. रितीरिवाजाप्रमाणे अस्थीचे विसर्जन करण्यात आले. सोमवारी श्रीनिवास नावाचा दुसरा कलश घेण्यासाठी संबंधित नातेवाईक शिवधाम स्मशानभूमीत आले. स्मशानभूमीतील शिपायाला खोली उघडण्यास सांगितले, आतमध्ये त्याच नावाचा अस्थिकलश होता; मात्र तो त्या नातेवाईकांनी ठेवलेला नव्हता. 

नातेवाईकांनी हा अस्थिकलश आमचा नाही असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नेमणुकीला असलेल्या शिपायाला मोठा प्रश्न पडला, त्याने तोच आहे असे सांगितले. नातेवाईकांनी नकार देत आमचा अस्थिकलश कोठे आहे? असा प्रश्न केला. शिपायाला काही समजेना, नातेवाईकांनी जेलरोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी याची शहानिशा केली; मात्र दोन्ही अस्थिकलशावर एकसारखे नाव व आडनाव असल्याने सर्वांची पुरती पंचायत झाली. शिपायाने शक्कल लढवली, नातेवाईकांना त्यांच्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याची राख कोठे टाकली आहे अशी विचारणा केली. नातेवाईकांनी राख टाकलेली जागा दाखवल्यानंतर त्यातील अस्थी काढून पुन्हा नवीन कलश तयार करून दिला. 

खोलीत असलेली श्रीनिवास नावाची अस्थी नेमकी कोणाची?- श्रीनिवास हे नाव व आडनाव एकच असलेल्या अस्थिकलशाच्या वादानंतर तो वाद सामोपचाराने मिटवण्यात आला. आमचा अस्थिकलश नसल्याची तक्रार करणाºया नातेवाईकांनी दुसºया अस्थी नेल्या. पहिल्यांदा अस्थिकलश नेलेल्या नातेवाईकांनी तर तो आमचाच होता असा दावा केला आहे. मग आता याच रुममध्ये लोखंडी अँगलला अडकावण्यात आलेला अस्थिकलश कोणाचा? असा प्रश्न स्थशानभूमीतील शिपायाला व अन्य लोकांना पडला आहे. 

नावात साम्य असल्याने अस्थिकलश घेऊन जाण्यात गल्लत झाली होती. हरकत घेतलेल्या नातेवाईकांना त्यांच्या व्यक्तीचा पुन्हा दुसरा अस्थिकलश तयार करून देण्यात आला आहे. या बाबत नातेवाईकांनी तक्रार दिली नाही. वाद मिटला असून दोन्ही नातेवाईकांचे समाधान झाले आहे. - जे.एन. मोगल, पोलीस निरीक्षक, जेलरोड पोलीस ठाणे 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस