शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात मनसेची पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 18:21 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : ऊर्जामंत्री नितीन राऊतसह ऊर्जा सचिव तसेच महावितरण विभागाचे कार्यकारी संचालक यांच्यावर संगनमत करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार मनसेच्या वतीने राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर शहर पोलिसात दिली आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे देशभरासह महाराष्ट्रात २२ मार्च २०२० ते ८ जून २०२० दरम्यान कठोर टाळेबंदी होती. या काळात महावितरण कंपनीकडून वीज मीटर रीडिंग साठी प्रतिनिधी पाठवण्यात आले नाही. वीज देयक वितरण करण्यात आली नाहीत. घरातच बंदिस्त झालेल्या जनतेला या कालावधीतल्या वीज वापरासाठी महावितरण कंपनीकडून अचानक वापरापेक्षा तिप्पट-चौपट  अवाजवी रक्कमेची भरमसाठ विद्युत बिले पाठवण्यात आली आहेत.

लाॅकडाऊनच्या काळात  वीज बील माफ करणे व तसेच सवलत देण्याची घोषणा उर्जामंत्र्यांनी केली होती. मात्र सरसकट वीज बील भरा अन्यथा वीज पुरवठा बंद केला जाईल असा फतवा ऊर्जा मंत्रालयाने काढला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांची फसवणूक झाल्याचा आरोप करत मनसेच्या वतीने तक्रार केली आहे.  तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान गुन्हा दाखल न झाल्यास तहसीलकार्यावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा  मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरNitin Rautनितीन राऊतmahavitaranमहावितरणMNSमनसेPandharpurपंढरपूर