सोलापुरातील मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा अपघात; गाडी चक्काचूर झाल्याचे व्हिडीओ समोर
By आप्पासाहेब पाटील | Updated: May 15, 2026 11:57 IST2026-05-15T11:57:00+5:302026-05-15T11:57:27+5:30
सोलापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला. या अपघातात त्याची गाडी चक्काचूर झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

सोलापुरातील मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा अपघात; गाडी चक्काचूर झाल्याचे व्हिडीओ समोर
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला. या अपघातात त्याची गाडी चक्काचूर झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. या अपघातात दिलीप धोत्रे हे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, एका खासगी कामाच्या निमित्ताने दिलीप धोत्रे हे मुंबई-पुणे महामार्गावरून मुंबईला जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. त्यांच्यावर सध्या ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर येथे उपचार सुरू असल्याची अधिकृत माहिती मनसे नेते प्रशांत गिड्डे यांनी दिली आहे. दिलीप धोत्रे हे मनसेचे प्रमुख नेते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.