शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: होय, दोन्ही काँग्रेसच्या विलीनीकरणाची गरज; सुशीलकुमार शिंदे वक्तव्यावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 04:25 IST

शिंदे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना शरद पवार हे ८० व्या वर्षी पक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सोलापूर: होय, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची गरज असून, माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शिंदे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना शरद पवार हे ८० व्या वर्षी पक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता माझंही वय झालेले आहे. आम्ही थकलो आहोत. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी टीकेची झोड उठविली आहे. त्याचबरोबर इतर पक्षाकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.यावर शिंदे म्हणाले, आम्ही आता थकलेले आहोत, हे वक्तव्य माझे वैयक्तिक असून याचा अर्थ भाजप किंवा मोदी यांच्यासाठी टक्कर देण्यासाठी आम्ही थकलेलो नाहीत. सत्ताधाऱ्यांसाठी लढा देण्यासाठी आम्ही अजून जवान आहोत. काँग्रेसमध्येही माझ्याप्रमाणे इतर अनेक ज्येष्ठमंडळींचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष बळकट होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले तर आमची ताकद वाढेल असे आजही मला वाटत आहे. विलीनीकरणाबाबत मी व्यक्त केलेल्या या मतावर ठाम आहे.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एक झाल्यास ताकद वाढेल हे खरे आहे. विलीनीकरणाबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलेली भावना चांगली आहे. पण सद्यस्थितीत असं घडणं कठीण वाटते. ज्या मुद्यावरून शरद पवार बाहेर पडले हे मान्य होणं कठीण आहे.- बळीराम साठे,जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSolapurसोलापूर