‘लोकमत’ बांधावर; परतीच्या पावसानं तोंडाशी आलेला घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 02:50 PM2019-11-06T14:50:15+5:302019-11-06T14:52:17+5:30

मंगळवेढा तालुका; ज्वारीच्या कोठाराला लागली दृष्ट; गतवर्षी पावसाअभावी पेरणी झाली नव्हती

On the 'Lokmat' dam; In return, the grass in the mouth disappeared | ‘लोकमत’ बांधावर; परतीच्या पावसानं तोंडाशी आलेला घास हिरावला

‘लोकमत’ बांधावर; परतीच्या पावसानं तोंडाशी आलेला घास हिरावला

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळवेढा हे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. मात्र यावर्षी परतीच्या पावसाने दृष्ट लागलीमंगळवेढा, ब्रह्मपुरी, बोराळे, मुंढेवाडी शिवारात रब्बी हंगामातील पिके उगवून आल्यानंतर पाऊस पडलापहिल्यांदा परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातल्याने पिकाचे गणित पूर्णत: कोलमडले

मल्लिकार्जुन देशमुखे 

मंगळवेढा : आतापर्यंत अनेक वेळा पावसाळ्यात भरपूर पाऊस पडला; पण तो ठराविक अंतराने उघडीप द्यायचा.. पिकाला नुकसानकारक ठरत नसायचा.. दिवाळीला पण कधी कधी एक-दोन दिवसांचा होत असायचा. यंदा परतीचा असा पहिल्यांदा पाऊस पाहिला. हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे, असं बुजुर्ग मंडळींनी ‘लोकमत’शी बोलताना आपली व्यथा मांडली. ज्वारीचं कोठार समजल्या जाणाºया मंगळवेढा तालुक्याला यंदा दृष्ट लागल्याचेही निराशाजनक सूर उमटू लागले आहेत. 
काळ्या आईची मोठ्या अपेक्षेने ओटी भरली; पण गेल्या पंधरा दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने अक्षरश: आमच्या लक्ष्मीची माती झाली आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने बळीराजाचे अश्रू आटले. त्याचा कुणी ठाव घ्यावा का, अशी काळजाला भिडणारी आर्त हाक भाळवणी येथील शेतकरी महादेव कांबळे यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठची आठ ते दहा गावे सोडली तर तालुक्यातील उर्वरित गावात शेतीला पूरक पाण्याची कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नसल्याने बागायती क्षेत्र फार कमी आहे. या परिसरात खरीप आणि रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. खरीप हंगामात प्रामुख्याने बाजरी, भुईमूग, तूर, मटकी, मका, सूर्यफूल तर रब्बीमध्ये ज्वारी, हरभरा, गहू, मका आदी पिके घेतली जातात.
तालुक्यात ५१ हजार १७८ हेक्टर रब्बीचे क्षेत्र असून, आजपर्यंत ४४ हजार १२० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. जवळपास ८७ टक्के पेरणी झाली आहे. ज्या शेतकºयांनी कांदा काढला, तो पावसात भिजून सडून गेला तर रब्बीत लागवड केलेला कांदा सरीतील पाणी न हटल्याने पाण्याने करपून जात आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

पिकांचे गणित कोलमडले
- मंगळवेढा हे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. मात्र यावर्षी परतीच्या पावसाने दृष्ट लागली आहे. मंगळवेढा, ब्रह्मपुरी, बोराळे, मुंढेवाडी शिवारात रब्बी हंगामातील पिके उगवून आल्यानंतर पाऊस पडला नाही, तरी निवळ थंडीवर परिपूर्ण येतात. मात्र यावर्षी पहिल्यांदा परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातल्याने पिकाचे गणित पूर्णत: कोलमडले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांना काहीही अंदाज बांधता येत नसल्यामुळे तो मोठ्या संकटात सापडला आहे. 

परतीच्या पावसाने शेतकºयांचे झालेले नुकसान भरून न येणारे आहे. शेतकºयांना शासनाने संपूर्ण कर्जमाफी द्यावी. अनुदान देऊन उपयोग होणार नाही, महागडी औषधे फवारणी करून आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात पिके सडून गेली आहेत.
- अनिल बिराजदार, शेतकरी सिद्धापूर

गेल्या काही दिवसांपासून पडणाºया पावसामुळे पिके भुईसपाट झाली आहेत. कांद्याची रोपे सडून गेली आहेत. तीन वर्षे पाऊस नव्हता. यावर्षी झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.
- समाधान शिरसट, शेतकरी ब्रह्मपुरी

Web Title: On the 'Lokmat' dam; In return, the grass in the mouth disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.