शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात पिण्याच्या पाण्यासाठी शॉक लागून जीव जाणं, हे तर लाजिरवाणं: असदुद्दीन ओवैसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:07 IST

ते पानगल हायस्कूल येथे झालेल्या उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलत होते. ओवेसी म्हणाले, गुजरातमध्ये पेट्रोल ९४ रुपये लिटर मिळते, तर सोलापुरात ते १०४ रुपयांना का?

सोलापूर : शहरात आजही पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. पाणी कमी वेळ व कमी दाबाने येत असल्यामुळे नागरिकांना मोटार लावून पाणी उचलावे लागते आणि त्यात विजेचा शॉक लागून लोकांचा मृत्यू होत आहे. पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी लोकांचा जीव जात असणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

ते पानगल हायस्कूल येथे झालेल्या उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलत होते. ओवेसी म्हणाले, गुजरातमध्ये पेट्रोल ९४ रुपये लिटर मिळते, तर सोलापुरात ते १०४ रुपयांना का? १० रुपये महाग पेट्रोल का मिळते? फक्त २५० किमी अंतरावर असलेले पुणे इतके पुढे गेले, सोलापूर मागेच का राहिले? असा थेट सवाल त्यांनी केला. 

महापालिकेकडे आलेल्या सुवर्णजयंती योजनेतील ४०० कोटी आणि अमृत योजनेतील १५० कोटी कुठे गेले? कोणाच्या खिशात गेले?
महानगरपालिकेचा तब्बल १३०० कोटींचा अर्थसंकल्प जातो कुठे? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी महापालिका कारभारावर जोरदार हल्ला चढवला. निवडणूक तिकिटाच्या वादातून रविवार पेठेतील तरुणाचा खून होणे ही सोलापूरसाठी अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे ते म्हणाले.

 एमआयडीसीतील आगीत कामगारांचा जनावरांप्रमाणे मृत्यू झाला, त्यातील एकही जीव अग्निशामक दलाला वाचवता आला नाही; हे प्रशासनाचे मोठे अपयश. सभेदरम्यान फारूक शाब्दींचे नाव काढताच उपस्थितांमधून मोठ्याने आवाज केला जात होता. एका इच्छुक उमेदवाराने भाषण सुरू करताच भावनिक होत अश्रू ढाळले. त्यावर जनसमुदायातून शाब्दी शाब्दी... अशी घोषणाबाजी होऊ लागली. तेव्हा त्यावेळी ओवैसी यांनी व्यासपीठावरून हस्तक्षेप केला.

उमेदवाराला थांबवत त्यांनी माईकचा ताबा घेतला अन् म्हणाले, फारूक शाब्दी यांनी राजीनामा देण्यापूर्वी माझ्याशी एकदाही चर्चा केलेली नाही. निवडणुकीनंतर मी त्यांची भेट घेईन, पक्षात पुन्हा आणण्याचा प्रयत्न करीन. त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही, असे आश्वासन देऊन त्यांनी जनसमुदायाला शांत केले. दरम्यान, ओवैसी यांचे सायंकाळी सोलापुरात आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जणू रॅलीच काढली.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Owaisi slams Solapur water woes, calls deaths 'shameful'.

Web Summary : Owaisi criticized Solapur's water issues, citing deaths from electric shock due to water scarcity as shameful. He questioned the misuse of municipal funds, compared petrol prices to Gujarat, and lamented Solapur's slow progress compared to Pune. He also addressed a resignation within his party.
टॅग्स :Solapur Municipal Corporation Electionसोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026