शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तर रेल्वेतील चेंगराचेंगरी रोखू शकेल !

By admin | Updated: May 20, 2014 01:07 IST

इंद्रायणीचीच अधिक भीती : मुंबई-पुणे-सोलापूर गाडीला एकच क्रमांक असावा

सोलापूर : पुण्यात इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वे प्रशासन, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान अलर्ट झाले आहेत. दरम्यान, गाडी एकच मात्र तिचे काही अंतरांपर्यंत वेगवेगळे क्रमांक असल्यामुळे ही घटना घडल्याच्या प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांमधून ऐकावयास मिळाल्या. मुंबई-पुणे ही गाडी २२१५ या क्रमांकाने धावते. पुढे ती पुणे-सोलापूर इंद्रायणी म्हणून धावताना तिचा क्रमांक बदलला जातो. सोलापूरपर्यंत इंद्रायणी एक्स्प्रेसचा क्रमांक असतो तो २२१७०. दुपारी दीड ते पावणेदोनच्या दरम्यान इंद्रायणी सोलापूरला येते. ती काही वेळानंतर पुन्हा पुण्याकडे मार्गस्थ होते. मार्गस्थ होणार्‍या या गाडीचा क्रमांक पुन्हा बदलला जातो. दुपारी दोन वाजता सुटलेली इंद्रायणी पुढे मुंबईकडे जाते. त्यावेळी तिचा क्रमांक २२१० असा होतो. काही जणांना सोलापूरहून मुंबईकडे जावे लागते. इंद्रायणी गाडीतून जर प्रवास करावयाचा असेल तर त्याला पुणेपर्यंतच प्रवास मिळतो. पुन्हा त्याला तिकीट काढून पुढचा प्रवास करावा लागतो. एकूणच सातत्याने बदलत असलेल्या गाडी क्रमांकाचा फटकाही बसतो. शिवाय मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडण्याची शक्यता असते. जी गाडी मुंंबईहून पुण्याला धावते. तीच गाडी इंद्रायणी नावाने पुढे सोलापूर आणि लगेच पुण्याला रवाना होते, त्या गाडीचा क्रमांक कायम ठेवला तर दुर्घटना टळू शकेल, असा अंदाज जिल्हा प्रवासी संघाचे अध्यक्ष हर्षद मोरे, उपाध्यक्ष संजय पाटील, सोलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव आदींनी वर्तवला आहे.

--------------------------

लोहमार्ग, आरपीएफ पछाडत आहेत जंग जंग ४पुण्याहून सोलापूरला तर सोलापूरहून पुण्याला जाणार्‍या प्रवाशांची संख्या वाढतच असते. पुण्याहून सोलापूरला येणार्‍या इंद्रायणीतून उतरणार्‍या आणि गाडीत प्रवेश मिळण्यासाठी प्रवासी आमने-सामने भिडत असतात. यातून मोठ्या प्रमाणावर गोंधळ तर उडतोच शिवाय काही दुर्घटना घडण्याची भीती अधिक असते. इंद्रायणी येण्याच्या आणि जाण्याच्या वेळेत लोहमार्ग आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे जवान आपल्या परीने गर्दीवर नियंत्रण आणतात खरे. मात्र शेवटी प्रवाशांचेही काही कर्तव्य आहे.