शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल बोर्डामुळे आरोपींची ओळख

By admin | Updated: May 25, 2014 01:01 IST

ट्रकचालकाला मारहाण : टोळीचा म्होरक्या गजाआड

दक्षिण सोलापूर : मंद्रुप-कामती बायपासवर ट्रक अडवून लुटमार करणार्‍या टोळीच्या म्होरक्याला अवघ्या सहा तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे़ मंद्रुपमधील डिजिटल बोर्डवरुन झळकणारा म्होरक्या पीडित चालकाने हेरला आणि नावासह फिर्याद दिल्याने आरोपीचा छडा लागू शकला़ मंद्रुप परिसरात बायपास रोडवर शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सहा जणांनी दुचाकी आडव्या लावल्या़ ट्रक अडवून चालकाच्या खिशातील ३८ हजार ९१० रुपये हिसकावून घेतले आणि त्याला काठी, लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली, अशी तक्रार ट्रकचालक जी़ नलय्या गोविंदराज यांनी सकाळी मंद्रुप पोलिसात केली़ टी़ एऩ ६०, सी़ २६३० क्रमांकाचा ट्रक गुजरातहून पाँडेचरीकडे जात होता़ मंद्रुपपासून अर्धा कि़मी़ अंतरावर ही घटना घडली़ या घटनेनंतर फिर्याद देण्यासाठी ट्रकचालक मंद्रुपमध्ये आला़ सर्व आरोपी अनोळखी असल्याने त्याच्यासमोर मोठा पेच होता़ स्टँडच्या मागे लावलेल्या सोशल ग्रुपच्या डिजिटल बोर्डावरच्या चेहर्‍यात साम्य वाटल्याने निसार बागवान याचे नाव संशयीत म्हणून फिर्यादीत नोंदवले़ त्यावरुन पोलिसांनी निसार बागवान आणि त्याचा साक्षीदार समीर गौस मुल्ला(दोघेही रा़ मंद्रुप) यांना सहा तासात पोलिसांनी अटक केली़ अन्य चार साथीदार फरार आहेत़

------------------------

रस्ता चोरांच्या सोयीचा तेरामैल ते कामती हा बायपास रोड अत्यंत खराब झाला आहे़ त्यामुळे वाहनांना अत्यंत धिम्यागतीने वाटचाल करावी लागते़ या निकृष्ट रस्त्याचा लाभ चोरटे घेत आहेत़ वर्षभरात खराब रस्त्याचा लाभ उठवून ट्रक अडवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़