शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटचे ७१ कोटी मिळाले

By admin | Updated: May 20, 2014 01:04 IST

तिसरा टप्पा : दोन दिवसांत तहसीलदारांकडे वर्ग करणार

सोलापूर: फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीची तिसर्‍या टप्प्याची रक्कम शासनाने दिली असून, पुणे विभागाला १५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक ७० कोटी ६६ लाख ५४ हजार रुपये मिळाले आहेत. गारपीटग्रस्त पीक नुकसानीपोटी शेतकर्‍यांना वाटपासाठी यापूर्वी ३०५ कोटी रुपये देण्यात आले होते. यापैकी पुणे जिल्ह्याला ५३ कोटी ४२ लाख, सातारा जिल्ह्याला ५४ लाख २५ हजार, सांगली जिल्ह्याला १६ कोटी ४३ लाख तर सोलापूर जिल्ह्याला २३४ कोटी ६० लाख ७५ हजार रुपये मिळाले आहेत. तिसर्‍या टप्प्यात पुणे विभागाला १५० कोटी रुपये आले आहेत. सोलापूर जिल्ह्याला आलेली ७० कोटी ६६ लाख ५४ हजारांची रक्कम मागणीप्रमाणे तालुक्यांना दिली जाणार आहे. माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यांना यापूर्वीच मागणीप्रमाणे निधी मिळाल्याने यातील रक्कम अन्य तालुक्यांना दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

---------------------

१५० कोटींचे वितरण

पुणे विभागाला तिसर्‍या टप्प्यासाठी आलेली १५० कोटींची रक्कम तीन जिल्ह्यांना वितरित केली आहे. सातारा जिल्ह्याची मागणीच नाही तर कोल्हापूरला गारपीट झाली नव्हती. पुणे- ७० कोटी १४ लाख २५ हजार, सांगली- ४ कोटी ६६ लाख ४९ हजार, सोलापूर- ७० कोटी ६६ लाख ५४ हजार.

---------------------

वाटप पूर्ण झाल्यावर निधीची मागणी ४काही गावांतून गारपीट पंचनामे होऊनही मदतीच्या यादीत नावे नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याची तपासणी करून अहवालाची मागणी केली आहे. आता आलेली रक्कम वाटपाचे काम पूर्ण झाल्यानंतर दिलेली रक्कम, वाटप झालेली रक्कम व शिल्लक रक्कम याचा आढावा घेण्यात येईल. तहसीलदारांकडून आढावा घेतल्यानंतर नुकसानग्रस्तांसाठीच्या निधीची मागणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.

--------------------------------

पंचनाम्यानुसार केलेल्या मागणीप्रमाणे यापूर्वी मिळालेले २३४ कोटी ६० लाख रुपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. मागणीप्रमाणे उर्वरित मिळालेली ७१ कोटींची रक्कम दोन-तीन दिवसात बँकांकडे दिली जाईल. - डॉ. प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी