Fire near wood house near Soregaon; Eight firefighters arrived at the scene | सोरेगावजवळील लाकूड अड्ड्याला लागली आग; अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी
सोरेगावजवळील लाकूड अड्ड्याला लागली आग; अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

सोलापूर : सोरेगाव रस्त्यावरील गजानन मंदिराच्या जवळील शिलाई मशीनचे टॉप तयार करणाऱ्या पिसे इंडस्ट्रीजला आग लागली आहे. ही आग मोठी लागली असून अग्निशमन दलाच्या 7 ते 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान प्रयत्न करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Web Title: Fire near wood house near Soregaon; Eight firefighters arrived at the scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.