शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गांवर चारचाकी वाहनांना १ डिसेंबरपासून फास्टॅग बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 03:11 IST

वाहनमालकांची वेळ आणि इंधनाची होणार बचत; बँका, टोलनाके आणि आॅनलाइन मिळेल चिप

सोलापूर : राज्यातील सर्व चारचाकी वाहनांना १ डिसेंबरपासून टोल नाक्यांवरील रांगांमध्ये अडकून राहावे लागणार नाही. मात्र त्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना फास्टॅग असणे बंधनकारक आहे. महामार्गांवरील टोल नाक्यांवर एक डिसेंबर २०१९ पासून टोलची रक्कम रोखीने स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे चार चाकी व मोठ्या वाहनधारकांनी फास्टॅग बसवून घ्यावेत, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सोलापूर येथील प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले. भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २०१६ पासून फास्टॅग इलेक्ट्रॉनिक सिस्टीम सुरू केली आहे. मंत्रालयाने १ डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर रोख रकमेने टोल भरता येणार नाही आणि वाहनचालकांनी फास्टॅग यंत्रणेचा वापर करावा, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे, असे कदम यांनी नमूद केले.

फास्टॅग यंत्रणा सर्व पथकर नाक्यांवर उपलब्ध असून, स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस, आयडीएफसी आदी बँकांच्या शाखांमध्येही ते विकत घेता येतील. याशिवाय आॅनलाइन परचेस पोर्टलवर ते मिळतील आणि गुगल प्ले स्टोअरवरही फास्टॅग अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहे. फास्टॅग एक पातळ इलेक्ट्रॉनिक चिप असून, ती वाहनांच्या समोरील भागात लावायची असते. विविध रकमांची चिप विकत घेता येते तसेच ती बँक अकाउंटला जोडता येते. फास्टॅग असलेले वाहन टोल नाक्यावरून जाताच तेथील टोलची रक्कम आपोआप त्यातून जमा केली जाते. सर्व टोल नाक्यांवर फास्टॅगसाठी पथकर उपकरणे आहेत. चिप स्कॅन होताच टोल नाक्यावरील बूम आपोआप उघडले जाईल आणि कोणत्याही अडथळ्याविना वाहन पुढे जाऊ शकेल.फास्टॅगचे फायदे...फास्टॅगच्या वापरामुळे वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. अनेक टोल नाक्यांवर बऱ्याचदा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे पुढे जाण्यास विलंब तर होतोच, पण इंधनही वाया जाते.ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आॅफ इंडिया आणि कोलकाताच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटने अभ्यासातून आणलेल्या फास्टॅगमुळे देशभरात ८७ हजार कोटी रुपयांची वर्षाला बचत होईल, असे म्हटले आहे. शिवाय प्रदूषणही कमी होईल.

टॅग्स :Mumbaiमुंबईcarकार