शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बावीस वर्षांपूर्वी हरवलेला धर्मेंद्र घरी परतला; झारखंडच्या घरी आईला पाहून ढसाढसा रडला

By रूपेश हेळवे | Updated: March 28, 2025 13:22 IST

वडील शोधायला गेले; परतलेच नाहीत पण रेल्वे कर्मचाऱ्याने दाखवली मानवता

रूपेश हेळवे, लोकमत न्यूज नेटवर्क, सोलापूर: झारखंडचा धर्मेंद्र मित्रांबरोबर गुजरात पाहायला निघाला; पण सोलापुरातच भरकटला... मित्र गावी गेले. नंतर खूप शोधलं; पण सापडला नाही. तब्बल बावीस वर्षे गेली. रेल्वे कर्मचारी रमेश मीना यांना हा मनोरुग्ण रस्त्यावर दिसला अन् त्यांनी चौकशी करून धर्मेंद्रसिंगला गावी पाठविण्याची व्यवस्था केली.

धर्मेंद्रसिंग सात रस्ता परिसरात उन्हात-पावसात तसेच पडून राहत होता. ही बाब सोलापुरातील रमेश मीना यांना कळाली. त्यांनी धर्मेंद्रशी मैत्री केली. त्याला बोलतं केलं. गावाचं नाव सांगण्याइतका तो आत्मविश्वासानं बोलू लागला; मग काय सारंच सोपं... धर्मेंद्रच्या आईला व्हिडीओ कॉल लावला अन् माय-लेक एकमेकांकडे पाहून फक्त रडतच राहिले.

धर्मेंद्रसिंग हा झारखंडमधील बोकारो जिल्ह्याचा असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर मीना यांनी बोकारो जिल्ह्यातील नारायणपूर येथील सब इन्स्पेक्टर अनिल लिंडा यांच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. लिंडा यांनी घरी जाऊन व्हिडीओ कॉल लावून धर्मेंद्रच्या आईला फोन दिला. त्यानंतर धमेंद्रचा भाऊ झारखंडहून त्याला नेण्यासाठी सोलापुरात आला. नुकतेच त्याचे पोखरिया गावात वाजत गाजत स्वागत करण्यात आले.

वडील शोधायला गेले; परतलेच नाहीत

धर्मेंद्रला शोधून आणल्याशिवाय घरी येणार नाही, असे म्हणत दोन वर्षांनंतर त्याचे वडील गेले. अद्यापही ते परतले नाहीत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

मी त्याची दाढी कटिंग केली. त्याच्यासोबत जवळीक वाढवण्यासाठी दररोज जाऊन त्याला भेटत होतो. त्याला काही आठवत नव्हते. त्याने एका दिवशी राज्याचे, त्यानंतर जिल्ह्याचे आणि गावाचे नाव असा पत्ता सांगितला. पोलिसांचेही सहकार्य मिळाले.  
-रमेश मीना, रेल्वे कर्मचारी

टॅग्स :Solapurसोलापूर