शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑीय महामार्ग ठेकेदाराला ठोठावलेला दंडाचा निर्णय कायम

By admin | Updated: May 30, 2014 00:56 IST

प्रांताधिकार्‍यांनी अपील फेटाळले : १६ कोटी ४३ लाखांचा केला होता दंड

सोलापूर: राष्टÑीय महामार्गाचे ठेकेदार आय.एल.अ‍ॅन्ड एफ.एस. लि. यांनी बेकायदेशीर मुरुम उचलल्याप्रकरणी उत्तर सोलापूर तहसीलदारांनी ठोठावलेल्या दंडाचा निर्णय प्रांताधिकार्‍यांनी कायम ठेवला आहे. कंपनीचे अपील नामंजूर करताना तहसीलदारांनी नियमाप्रमाणे काम केले नसल्याने त्यांची स्वतंत्र चौकशी करण्याचा निर्णय प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी दिला आहे. पुणे-सोलापूर राष्टÑीय महामार्ग क्र. ६५ चे काम आय.एल. अ‍ॅन्ड एफ.एस.लि. व सहठेकेदार जी.एच.व्ही. इंडिया यांना उत्तर सोलापूरच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय मुरुम उपसा केल्याची नोटीस फेब्रुवारी व मार्च २०१३ मध्ये बजावली होती. त्याचे उत्तर देताना या ठेकेदार कंपन्यांनी मुरुम उत्खनन रॉयल्टी भरुन व परवनगीनेच केल्याचे म्हटले होते. त्यानंतर तहसीलदारांनी १९ सप्टेंबर २०१३ रोजी एक लाख २२ हजार ६३३ ब्रास मुरुम पूर्वपरवानगीशिवाय उत्खनन केल्याचा ठपका ठेवत रॉयल्टीची रक्कम व तीनपट दंड असा १६ कोटी ४३ लाख २८ हजार २२० रुपये दंड भरण्याचा निर्णय तहसीलदार अंजली मरोड यांनी दिला होता.

---------------------------

दृष्टिक्षेपात घटनाक्रम...

तहसीलदारांनी आय.एल.अ‍ॅन्ड एफ.एस.लि. ला दोषी धरल्यानंतर प्रांताधिकार्‍यांकडे केले होते अपील तहसीलदारांचा एक लाख २२ हजार ६३३ ब्रास मुरुम परवानगीशिवाय उत्खनन केल्याचा कंपनीवरील ठपका कायम तहसीलदारांचा कंपनीला १६ कोटी ४३ लाख २८ हजार २२० रुपयांचा केलेला दंडही प्रांताधिकार्‍यांकडून कायम कंपनीने कोंडी, अकोलेकाटी व बीबीदारफळ हद्दीत शेतकर्‍यांशी करार करुन उचलला होता मुरुम कंपनीने रॉयल्टीपोटी १६ कोटी ७८ लाख रुपये भरले होते कोंडी, अकोलेकाटी या माळढोक अभयारण्य परिसरातील मुरुम उचलल्याचा ठपका ठेवणार्‍या तहसीलदारांनीच मुरुम उचलण्यासाठी चलने भरुन घेतली आहेत. एकीकडे रॉयल्टीपोटी पैसे भरुन घेतले तर दुसरीकडे मुरुम उपसा थांबविण्याच्या नोटिसा तहसीलदारांनी दिल्या आहेत मुरुम उचलण्यासाठी वेळोवेळी तहसीलदारांनीच चलने भरुन घेतली व त्यांनीच विनापरवाना मुरुम उचलल्याचा कंपनीवर ठपका ठेवल्याचा निष्कर्ष प्रांताधिकार्‍यांनी काढला तहसीलदारांनाही जबाबदार धरत त्यांची स्वतंत्ररित्या चौकशी करावी असे निर्णयात म्हटले आहे तहसीलदारांचा १६ कोटी ४३ लाखांचा कंपनीला ठोठावलेला दंडाचा निर्णय कायम ठेवत कंपनीचे अपील निकाली काढले कंपनीने रॉयल्टीपोटी अधिक रक्कम भरली असल्यास ती मागणी करावी, असेही प्रांताधिकार्‍यांच्या निकालात म्हटले आहे

---------------------------------

तहसीलदारावर ताशेरे ! प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी उत्तरच्या तहसीलदार अंजली मरोड यांच्यावर ताशेरे मारले आहेत. जिल्हाधिकारी स्तरावर पत्रव्यवहार झालेला असल्याने उत्तरच्या तहसीलदारांनी कंपनीने रॉयल्टी भरणा केली नसल्याच्या म्हणण्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. कंपनीने महामार्गासाठी वापरलेल्या गौणखनिजाची माहिती दिली नसल्याचे तहसीलदारांचे मतही प्रांताधिकार्‍यांनी खोडून काढले आहे. चलन भरुन घेतल्यानंतर उत्खननाचा आदेश देण्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठविला नाही. तहसीलदारांनी नियमानुसार केले नसल्याचे प्रांताधिकार्‍यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.