शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

जनगणना २०२७: सोलापूरकरांसाठी मोठी संधी; आता घरबसल्या करा स्वतःची ‘स्व-गणना’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 01:20 IST

सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने या 'स्व-गणना' सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

सोलापूर: भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत जनगणना विभागाने 'जनगणना २०२७' अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी एक अभिनव पाऊल उचलले आहे. आता नागरिकांना प्रगणकाची वाट न पाहता, स्वतःहून आपल्या कुटुंबाची माहिती डिजिटल पोर्टलवर नोंदवता येणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने या 'स्व-गणना' सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

१ मे ते १५ मे दरम्यान संधी आगामी जनगणनेसाठी ही स्व-गणनेची सुविधा १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. नागरिकांनी https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला मोबाईल क्रमांक वापरून ओटीपी द्वारे लॉगिन करणे आवश्यक आहे. त्यानंतर नकाशावर आपल्या घराचे अचूक स्थान दर्शवून कौटुंबिक माहिती भरता येईल. संकेतस्थळावर अत्यंत साध्या आणि सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. माहिती भरून सबमिट केल्यानंतर नागरिकांना एक (युनिक क्रमांक) प्राप्त होईल. हा क्रमांक घरी येणाऱ्या संबंधित प्रगणक कर्मचाऱ्याला देणे अनिवार्य आहे.  प्रगणकाची वाट पाहण्याची गरज नाही, घरबसल्या केव्हाही नोंदणी करता येईल. स्वतः माहिती भरल्यामुळे चुकीची माहिती नोंदवली जाण्याची शक्यता कमी होईल. नागरिकांनी दिलेली माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही महापालिकेने सांगितले.

मुख्याध्यापक आणि प्राचार्यांवर मोठी जबाबदारी -सोलापूर महानगरपालिकेने शाळा, महाविद्यालये, शासकीय संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना या राष्ट्रीय कार्यात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये जनजागृती करून त्यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

जनगणना ही केवळ आकडेवारी नसून देशाच्या भविष्यातील विकासाच्या योजनांचा पाया आहे. सोलापूरच्या सर्व नागरिकांनी या आधुनिक सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे. - डॉ. सचिन ओंम्बासे, मनपा आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Census 2027: Register online from home; a big opportunity.

Web Summary : Solapur citizens can now participate in Census 2027 by self-registering online from May 1-15, 2026. Visit se.census.gov.in, use OTP login, pinpoint your location, and fill out the form. A unique number will be generated. Municipal Corporation urges active participation.
टॅग्स :Solapur Municipalसोलापूर महानगरपालिका