Breaking; सोलापूरजवळ जीप गाडीचा मोठा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 09:29 IST2022-01-16T09:27:46+5:302022-01-16T09:29:19+5:30

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथून सोलापूरकडे येत असताना स्कार्पिओ जीप झाडाला धडकून झालेल्या अपघातांमध्ये सोलापुरातील तिघे जागीच ठार ...

Breaking; Major jeep accident near Solapur; All three died on the spot | Breaking; सोलापूरजवळ जीप गाडीचा मोठा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

Breaking; सोलापूरजवळ जीप गाडीचा मोठा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथून सोलापूरकडे येत असताना स्कार्पिओ जीप झाडाला धडकून झालेल्या अपघातांमध्ये सोलापुरातील तिघे जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी मध्यरात्री ११.४५ वाजता घडली.


 किशोर अण्णाराव भोसले (वय ४५ रा. सळई मारुती मंदिर उत्तर कसबा), नितीन भगवान भांगे (वय ३२ रा.निराळे वस्ती सोलापूर), व्यंकटेश राम म्हेत्रे (वय ४५ रा.मोदी खाना सोलापूर) असे ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. याच अपघातात राकेश हुच्चे (रा.सोलापूर) हा एक जखमी आहे.  यातील तिघे जण जीप (क्र. एमएच १३ एझेड ९९०९) मध्ये बसून औरादवरून सोलापूरच्या दिशेने येत होते. जीप तेरामैलजवळील वकील वस्तीजवळ आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला जोरात धडकली, त्यात तिघेही गंभीर जखमी झाले. तिघांना पहाटे ३.५० वाजता मित्र संभाजी जुगदार यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. नितीन भांगे हा मंडप कॉन्ट्रॅक्टर असून तिघेही लाईट डेकोरेशनच्या कामासाठी औराद परिसरात गेले होते. काम संपवून रात्री घरी परतत येत असताना अपघात झाल्याचे समजते. याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.

Web Title: Breaking; Major jeep accident near Solapur; All three died on the spot