शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 10:01 IST

अवघ्या सात दिवसांवर कार्तिकी यात्रा आली तरी, देवाची शासकीय महापूजा कुणाच्या हस्ते करावी या संदर्भात विधि व न्याय विभागाकडून मार्गदर्शन लाभले नाही.

सचिन कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, पंढरपूर |

Solapur Politics ( Marathi News ) : कार्तिकी यात्रा एकादशी सोहळा अवघ्या सात दिवसांवर आला आहे. मात्र सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहेत, तर दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे यंदाच्या कार्तिकीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न होता, शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.  आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना तर कार्तिकी यात्रेनिमित्त होणाऱ्या शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. सध्या राज्याला देवेंद्र फडणवीसअजित पवार असे दोन मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. फडणवीस व अजित पवार हे दोन्ही नेते निवडणूक लढवत आहेत, अशा व्यस्त कार्यक्रमातून हे वेळ काढून पंढरपूरला येतील का ? अचारसंहिता असल्याने त्यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करता येईल का ? असे प्रश्न समितीसमोर निर्माण झाले आहेत. यामुळे कार्तिकी यात्रेच्या शासकीय पूजेसंदर्भात समितीने विधि व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागविले आहे. अवघ्या सात दिवसांवर कार्तिकी यात्रा आली तरी, देवाची शासकीय महापूजा कुणाच्या हस्ते करावी या संदर्भात विधि व न्याय विभागाकडून मार्गदर्शन लाभले नाही. यामुळे ऐन वेळेस अधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा करावी लागणार असे चित्र निर्माण झाले आहे.

.. असे प्रसंग आले होते 

२०१६ साली कार्तिकी यात्रे दरम्यान नगर परिषदेची निवडणूक लागली होती. तेव्हा उपमुख्यमंत्री नसल्याने कार्तिकीच्या शासकीय महापूजेचा मान निवडणूक आयोगाच्या परवानगीने तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला होता. तर २०२० साली पदवीधर मतदार संघाची निवडणूकीची आचारसंहिता लागली होती. यावेळी आयोगाची परवानगी घेऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाचे शासकीय पूजा केली होते.

"सध्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. यामुळे कोणाच्या हस्ते कार्तिकी एकादशी दिवशी होणाऱ्या शासकीय महापूजेचा मान कोणाला द्यायचा याबाबत विधि व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागवले आहे. परंतु यासंदर्भात कोणताही लेखी आदेश आला नाही." - हभप गहिनीनाथ महाराज औसेकर सहअध्यक्ष, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती 

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस