शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील अंध संघटनांचे कार्यकर्ते होणार वºहाडी!

By admin | Updated: May 21, 2014 01:27 IST

विवाहाची उत्सुकता वाढली : अनेकांचे योगदान

सोलापूर : ‘लोकमत’ने राबविलेल्या ‘चला लग्नाला’ सदराचा समारोप पाच अंध बांधवांच्या विवाहाने होणार याचे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध होताच अंध संघटनेच्या राज्यभरातील प्रतिनिधींनी चौकशी करून विवाहाला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. दरम्यान विवाह सोहळ्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती व संस्थांनी हात पुढे केला. आसरा चौकातील पंचतारांकित बालाजी सरोवर हॉटेलच्या सभागृहात विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. हळदी व लग्नाची वरात हे कार्यक्रमही लक्षवेधक ठरणार आहेत. वृत्तपत्रात गाजलेल्या एका सदराचा समारोप आगळ्यावेगळ्या उपक्रमाने होत असल्याबाबत अनेकांनी याचे स्वागत केले. विवाह सोहळ्यात सहभागी झालेले बांधव राज्यभरातील आहेत. अंध संघटनेच्या राज्यातील पदाधिकार्‍यांनी मीडियाने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. ज्यांनी आयुष्यात प्रकाश पाहिला नाही, पण जिद्दीने अंधशाळेत शिक्षण घेऊन भरारी घेण्याची स्वप्ने पाहिली, आता सखीच्या सोबतीने सुखी संसाराची वाटचाल करण्यास उत्सुक असलेल्यांना ‘लोकमत’ने हात दिला. हा योग डोळस माणसांनाही पाहण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय दृष्टिहीन संघ भारतचे पश्चिम विभागीय सचिव प्रभाकर कदम यांनी व्यक्त केली. सोलापूर विद्यापीठातील टेलिफोन आॅपरेटर तुकाराम पवार यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमास व्यापारी, संस्था, व्यक्तींनी मदत केली आहे तर अनेकांनी फोन करून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. सामाजिक बांधिलकीतून मीडियाने यात पुढाकार घेतल्याचे कौतुक करून उद्योगपती राम रेड्डी यांनी बालाजी सरोवरमधील सभागृह उपलब्ध करून दिले. मनसेचे जिल्हाप्रमुख दिलीप धोत्रे, शिवशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बिज्जू प्रधाने, रोहन गायकवाड, रोहित गायकवाड, मोगले साडी सेंटरचे शिवकुमार मोगले, व्ही. आर. पवार यांच्या सौभाग्य सिल्क हाऊसचे राजेश पवार, नगरसेवक नागेश ताकमोगे, जितू राठी, पवन पाटील, परेश पाटील, सना मुजावर, धनराज गोयल फूट वेअर, सर्वोदय स्टिल सेंटरचे कुशल देढिया, आरटीओतील कर्मचारी संतोष सुरवसे, कस्तुरे असोसिएटचे मनीष कस्तुरे, पटेल फटाका वर्क्सचे एम. ए. पटेल, बी. वाय़ टेलरचे बालाजी यज्जा, अ‍ॅड. जयदीप माने, शैला गुड्डापल्ली, धांडेकर कॉटेज, संकेत हॉटेल, आरटीओ अधिकार्‍यांनी मदतीसाठी हात पुढे केला.

---------------------

या आगळ्यावेगळ्या उपक्रमात अंध वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’चे संपादक राजा माने, सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे, नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंडचे संस्थापक प्रकाश यलगुलवार, रोटरी क्लब आॅफ सोलापूर नॉर्थ संचलित भैरूरतन दमाणी अंधशाळेचे अध्यक्ष शिवाजी उपरे, सचिव संतोष भंडारी यांनी केले आहे.