Solapur ZP Election Result 2026: विधानसभेचा वचपा जिल्हा परिषदेत काढला! राम सातपुतेंच्या पत्नीकडून उत्तमराव जानकरांच्या मुलाचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 12:17 IST2026-02-09T12:16:31+5:302026-02-09T12:17:25+5:30

Solapur Zilla Parishad Election Results 2026: संस्कृती सातपुतेंच्या रूपाने राम सातपुते यांनी विधानसभेचा बदला घेत जानकरांना धक्का दिला.

BJP Strikes Back Sanskriti Satpute Defeats Jeevan Jankar in Solapur ZP Polls | Solapur ZP Election Result 2026: विधानसभेचा वचपा जिल्हा परिषदेत काढला! राम सातपुतेंच्या पत्नीकडून उत्तमराव जानकरांच्या मुलाचा पराभव

Solapur ZP Election Result 2026: विधानसभेचा वचपा जिल्हा परिषदेत काढला! राम सातपुतेंच्या पत्नीकडून उत्तमराव जानकरांच्या मुलाचा पराभव

Solapur ZP Election Results 2026:सोलापूर जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या दहिगाव जिल्हा परिषद गटात अखेर भाजपने मुसंडी मारली आहे. माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांचा पराभव केला. या निकालामुळे जानकरांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मोठा सुरुंग लावला असून हा राम सातपुते यांनी विधानसभा निवडणुकीचा वचपा काढल्याचे म्हटले जात आहे.

या निवडणुकीत संस्कृती सातपुते यांची प्रचाराची पद्धत जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती. आपल्या केवळ चार महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन त्यांनी दहिगाव गटातील गावे पिंजून काढली. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात संस्कृती सातपुते आणि त्यांच्या लहान बाळावर विरोधकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यात आली होती. या टीकेने प्रचाराचे वातावरण चांगलेच तापले. राम सातपुते यांनी जाहीर सभेतून या टीकेचा कडाडून समाचार घेतला. तुमची लढत माझ्याशी आहे, मग त्या निष्पाप लेकराला राजकारणात का ओढता? असा भावनिक सवाल त्यांनी मतदारांसमोर उपस्थित केला होता. 

आमदार जानकरांना घरच्या मैदानावर चपराक

विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांचा पराभव करून आमदार झालेल्या उत्तम जानकरांसाठी हा निकाल अनपेक्षित धक्का आहे. आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती, मात्र संस्कृती सातपुते यांच्या लाटेपुढे जानकरांची व्यूहरचना कोलमडली.  त्यामुळे आता माळशिरसमध्ये आजी-माजी आमदारांमधील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

केवळ जानकरच नव्हे, तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनाही या निकालाने मोठा हादरा बसला आहे. माळशिरस तालुक्यातील गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे मोहिते-पाटील आणि जानकर यांच्या वर्चस्वाला भाजपने त्यांच्याच बालेकिल्ल्यात सुरुंग लावला आहे.

Web Title : सोलापुर ZP चुनाव में बीजेपी ने विधानसभा हार का बदला लिया; जानकारों की हार।

Web Summary : सोलापुर ZP चुनाव में राम सतपुते की पत्नी संस्कृति ने उत्तमराव जानकर के बेटे को हराया, जो मौजूदा विधायक के लिए एक झटका है। बीजेपी ने अपनी पकड़ मजबूत की, जानकर और मोहिते-पाटिल के गढ़ों में उनकी प्रधानता को चुनौती दी।

Web Title : BJP avenges assembly defeat in Solapur ZP election; Janakars lose.

Web Summary : In Solapur ZP polls, Ram Satpute's wife, Sanskruti, defeated Uttamrao Jankar's son, a blow to the sitting MLA. BJP gains ground, challenging Jankar and Mohite-Patil's dominance in their strongholds.