शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या पट्ट्यातही भाजपाला पसंती

By admin | Updated: May 19, 2014 00:17 IST

उत्तर तालुका : वडाळ्यात काँग्रेसला अवघे ४१३ मताधिक्य

सोलापूर: मागील काही निवडणुकीत काँग्रेसचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या तसेच काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांचे मतदारसंघ व प्राबल्यातील गावातही भाजपानेच मताधिक्य मिळवले आहे. वडाळा गावावर एकहाती सत्ता असलेल्या वडाळा गावातही घसरण झाली असून, काँग्रेसला अवघ्या ४१३ मतांची आघाडी मिळाली आहे. बीबीदारफळ गावाने शिवसेना-भाजपाला आघाडी मिळविण्याची परंपरा कायम राखली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील ४० गावांतील लोकसभा निवडणुकीच्या निकालात उमेदवारांना मिळालेल्या आकडेवारीनुसार ११ गावांत काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना आघाडी मिळाली आहे. उर्वरित २९ गावांत भाजपाच्या शरद बनसोडे यांना काँग्रेसपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. भाजपाला बीबीदारफळ, कोंडी व रानमसले या गावांत सर्वाधिक मते मिळाली. काँग्रेसला वडाळ्यात सर्वाधिक ४१३ मते अधिक मिळाली. मोहोळ मतदारसंघाला जोडलेल्या उत्तरच्या २४ गावांमध्ये भाजपच्या बनसोडे यांना १६ हजार ९१८ तर काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना १२ हजार ५२८ इतकी मते मिळाली आहेत. शिंदे यांच्या पेक्षा बनसोडे यांना ४ हजार ३९० मतांचे मताधिक्य मिळाले आहे. २००९ च्या निवडणुकीत या २४ गावात बनसोडे यांच्यापेक्षा शिंदे यांना ५ हजार ७०० मताचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी मात्र उलटे चित्र दिसत आहे. उत्तर तालुक्यात अ‍ॅड. संजीव सदाफुले यांना सर्वाधिक १०९ मते कोंडी गावात तर बीबीदारफळ गावात ८७ मते मिळाली आहेत. अन्य गावात किरकोळ स्वरुपाची मते मिळाली आहेत.

----------------------

काँग्रेसच्या पट्ट्यात भाजपाची आघाडी ४ तिºहे परिसर हा काँग्रेसचा अन् आमदार दिलीप माने यांचा बालेकिल्ला आहे. आजपर्यंतच्या कोणत्याही निवडणुकीत भाजपा, सेना किंवा राष्टÑवादीने एकत्रित येऊन प्रयत्नांची पराकाष्टा केली तरीही काँग्रेस वरचढ ठरली आहे. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या उत्तरच्या १० पैकी कवठे व पाथरी या दोन गावांत अन् तेही किरकोळ मताधिक्य काँग्रेसला मिळाले आहे. भाजपाला आठ गावांत काँग्रेसपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. दहा गावांत भाजपाच्या शरद बनसोडे यांना ५५०३ तर काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना ४७९७ मते मिळाली आहेत. भाजपाला ८०६ मतांचे मताधिक्य मिळाले आहे.

----------------------------------

वडाळ्यात काँग्रेसला सर्वाधिक मते अनेक वर्षे वडाळ्यातील मतदार काँग्रेस-राकाँच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची घसरगुंडी झाली आहे. काँग्रेसला भाजपापेक्षा अवघी ४१३ मते अधिक मते मिळाली आहेत. बीबीदारफळ गावाने याही निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक मते दिली आहेत. भाजपाच्या बनसोडे यांना काँग्रेसच्या शिंदे यांच्यापेक्षा १२९० मते अधिक मिळाली आहेत.