- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - 'राज्यात सगळीकडे ढाब्यांवर मद्यविक्री, तरी आम्हीच दिसतो का, तुम्ही आमच्याच ढाब्यावर कसे येता' असे तो म्हणत उपळाई हद्दीतील (ता. माढा) येडेश्वरी ढाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांंना बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत गुरूवारी सकाळी माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री उशिरा घडली त्यामुळे या घटनेची माहिती गुरूवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमत शी बोलताना दिली.
या मारहाणीत उपनिरीक्षक अमित नागरे, अंमलदार युवराज टिळे हे दोघे जखमी झाले आहेत. दरम्यान, अवैध मद्यविक्री सुरू असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला टोल फ्री क्रमांकावर मिळाली होती. त्याठिकाणी कारवाईसाठी गेल्यावर ढाबा मालकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, अंमलदारासमवेत वाद घातला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्लास्टिक पाईपने मारहाण केली. तत्पूर्वी, गोंधळ सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अंमलदार मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटिंग काढत होते. त्यांचा मोबाईल त्याने काढून घेतला, तो परत दिलाच नाही. त्याठिकाणी झालेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उपनिरीक्षक नागरे यांच्या डोक्याला जखम झाली आहे.
Web Summary : Two excise officers were severely beaten during a raid on an illegal liquor dhaba in Solapur district. The officers sustained serious injuries after being attacked with plastic pipes when they tried to seize illicit alcohol. Police are investigating the incident.
Web Summary : सोलापुर जिले में अवैध शराब के एक ढाबे पर छापे के दौरान दो आबकारी अधिकारियों को बुरी तरह पीटा गया। अवैध शराब जब्त करने की कोशिश करने पर प्लास्टिक के पाइपों से हमला करने के बाद अधिकारियों को गंभीर चोटें आईं। पुलिस मामले की जांच कर रही है।