शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; पंढरपुरातील पंतप्रधान आवास योजनेच्या ८९२ घरांची लॉटरी सोडत रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 17:21 IST

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे : उच्चस्तरीय चौकशी नंतरच काम सुरू करावे 

पंढरपूर : पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाच्या कामाबाबत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विविध संघटनांनी तक्रार केल्या होता. यामुळे या कामास स्थगिती देण्याचे आदेश नगर विकास ऊर्जा आदिवासी विकास  उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहेत. यामुळे या प्रकल्पातील ८९२ घरांची लॉटरी सोडत रद्द करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. 

भीमा नदीच्या पूररेषेत सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाच्या कामाबाबत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विविध संघटनांनी तक्रार केल्या होता. या कामास स्थगिती देण्याचे आदेश नगर विकास ऊर्जा आदिवासी विकास  उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहेत. 

शहरातील गोरगरीब जनतेची राहण्याची सोय व्हावी. यासाठी पंढरपूर नगरपरिषदेने पंतप्रधान आवास योजनेचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पांतर्गत २००० घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र हा प्रकल्प पूररेषेत बांधला जातोय. मागील वर्षी आलेल्या पुरा दरम्यान पुराचे पाणी त्या प्रकल्पामध्ये होते. त्यामुळे त्या दरम्यान प्रकल्प बंद करण्यात आला होता. त्याच बरोबर कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दिल्या होत्या. शेतजमीन व दलदलीचा भाग, काळी माती असलेल्या ठिकाणी प्रकल्पाचे काम होत आहे. त्या ठिकाणी राहण्यास येणाऱ्या २ हजार कुटुंबाच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

यामुळे या प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करावी. तसेच पूररेषेत प्रकल्प सुरू करणाऱ्या नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. यामुळे हे काम थांबवावे. हा प्रकल्प दुसऱ्या योग्य ठिकाणी उभारला जावा. अशी मागणी राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी चे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, पंढरपूर शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी नगर विकास ऊर्जा आदिवासी विकास  उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत त्यांनी या प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करावी चौकशी अहवाल येण्यापर्यंत योजनेस स्थगिती द्यावी असे आदेश संबंधित विभागाला दिले आहे. हे पत्र जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे आले आहे. 

यामुळे पंढरपूर पंतप्रधान आवास योजनेच्या कामात स्थगिती असल्याने ६९२ घरांची लॉटरी सोडत रद्द करण्यात आली असल्याचे अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर