शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

कापड उत्पादकांचे दीडशे कोटी अडकले विदेशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 05:22 IST

कोरोनामुळे यंत्रमागधारक संकटात : रोजची पाच कोटींची उलाढाल ठप्प

बाळकृष्ण दोड्डी ।लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : लॉकडाउन काळात तब्बल तेवीस दिवस यंत्रमाग उद्योग बंद राहणार असल्याने यंत्रमाग उद्योजकांसमोर महासंकट उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, कोरोनामुळे देश-विदेशात लॉकडाउन सुरू असल्याने सोलापुरातील टेक्स्टाइल उत्पादकांची तब्बल दीडशे कोटी रुपयांची बिले अडकल्याची माहिती सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी दिली.सोलापूर शहरातील सातशे यंत्रमाग कारखानदारांकडे १२ हजार यंत्रमाग आहेत. तब्बल ४0 हजार कामगार या उद्योगावर अवलंबून आहेत. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार कापड उद्योगातून निर्माण होतो. या उद्योगात दररोज जवळपास पाच कोटींची उलाढाल होत असते.२३ मार्चपासून सोलापुरातील कापड उद्योग बंद आहे. १४ एप्रिलपर्यंत तब्बल तेवीस दिवस यंत्रमाग बंद राहणार आहेत.१४ एप्रिलनंतरही लॉकडाउन सुरू राहण्याची भीतीदेखील यंत्रमागधारकांमध्ये आहे. लॉकडाउनच्या महिनाभर आधी निर्यात केलेल्या मालाचे पैसेअद्याप येथील कापड उत्पादकांना मिळालेले नाहीत.त्यामुळे येथील उद्योजकांची आर्थिक कोंडी होत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून नवीन आॅर्डर नसल्याने तसेच येत्या १४ तारखेनंतरही लॉकडाउन सुरूच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे यंत्रमाग उद्योजक भीतीच्या सावटाखाली आहेत.सोलापुरी चादर, टॉवेल्सची या देशात होते निर्यातइराण, इराक, सौदी अरेबिया, दुबई यांसारख्या आखाती देशात तसेच युरोप, जर्मनी, आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या देशात सोलापुरी चादरी आणि टॉवेलची मोठी के्रझ आहे. प्रतिवर्षी पाचशे कोटींहून अधिक निर्यात या देशांमध्ये होते. एकूण उलाढालीपैकी ५0 ते ६0 टक्के निर्यातीवर येथील उद्योग अवलंबून आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांकडे सीझन म्हणून पाहिले जाते. या काळातच कोरोनाचे संकट उद्भवल्यामुळे कापड उद्योजकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर