शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

श्रीपूरमध्ये १३ जणांवर अ‍ॅट्रासिटी चुकीचा गुन्हा

By admin | Updated: May 30, 2014 00:47 IST

माघार घेण्याच्या मागणीसाठी श्रीपूर बंद

श्रीपूर : श्रीपूर येथे बुधवारी झालेल्या किरकोळ वादावरून १३ जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला म्हणून श्रीपूर व बोरगाव परिसरामधील सर्व नागरिकांनी अकलूज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यामध्ये अकलूज पोलीस ठाण्याचे पो.नि. विश्वास साळुंखे यांनी मोर्चेधारकांची तक्रार न घेता उलट दमबाजीची भाषा करत मोर्चेधारकांना दबंगगिरी करण्यात आली. श्रीपूरमध्ये बुधवारी २८ मे रोजी दुपारी गणेश वजाळे व संभाजी चव्हाण यांचा मोटरसायकल व टेम्पोची धडक झाल्याने किरकोळ बाचाबाची झाली. त्याचे मोठ्या मारहाणीत रूपांतर झाले. त्यावरून श्रीधर वजाळे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली असता त्यामध्ये आझाद शेख, कबीर शेख, हफीज शेख, समीर शेख, कबाब शेख, दावल शेख, बाबासाहेब होनमाने, नरेंद्र स्वामी जंगम, सुनील कदम, चांगदेव साळुंखे, सद्दाम शेख, संभाजी चव्हाण, शिवाजी भोसले (सर्व रा. बोरगाव) यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला असून पोलीस कोठडी मिळाली आहे. याच्याविरोधात सायंकाळी येथील सर्वपक्षीय, व्यापारी, सर्वसामान्य जनतेने अकलूज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यामध्ये ३०० ते ४०० नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये सायंकाळी श्रीपूर बंद पाळण्यात आला. अ‍ॅट्रॉसिटी मागे घ्यावी म्हणून सर्व मोर्चेधारकांची मागणी केली व खोटी तक्रार देणार्‍यास त्वरित अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. वजाळे यांच्याविरूद्ध शिवाजी भोसले (रा. बोरगाव) यांनी पोलीस ठाण्याला गणेश वजाळे, भीमराव वजाळे, विशाल जगधने, सुजीत वजाळे, गुट्टू वजाळे, विश्वजित भालशंकर इतर आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या मोर्चात व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र सावंत-पाटील, उपसरपंच अनिल जाधव, रतनसिंह रजपूत, नंदकुमार मांडवे, बाळासाहेब पिसाळ, अरूण तोडकर, संतोष गार्डीकर आदी सहभागी झाले होते.

-----------------------------

बाजू मांडायची असेल तर कायद्याचे ज्ञान घ्या, नंतर पोलीस ठाण्याला या, जमावामध्ये कुणालाही बोलता येते, दम असेल तर एकटा येऊन लेखी तक्रार करा, अशी अरेरावीची भाषा करून मोर्चेधारकांना बाजूच मांडू दिली नाही. - विश्वास साळुंखे पोलीस निरीक्षक, अकलूज पोलीस ठाणे

-------------------------------

कायदा सर्वांसाठी आहे. अ‍ॅट्रॉसिटीबद्दल घाबरू नये. लोकांनी लेखी तक्रार द्यावी, मग तपास करून अशा लोकांना हद्दपार, मोक्का असे गुन्हे दाखल करू. - संजयकुमार पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी