Video : जेव्हा डोनाल्ड ट्रंप यांनी WWEच्या 'रिंग'मध्ये आयोजकाची धुलाई करत केलं होतं त्याचं टक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 12:33 PM2019-09-28T12:33:21+5:302019-09-28T12:36:22+5:30

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक 2020मध्ये होणार आहे. आतापासूनच अमेरिकेमध्ये निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. ह्यूस्टनमध्ये आयोजित 'हाउडी मोदी'मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अबकी बार, ट्रंप सरकार' हा नारा दिला आहे.

WWE wrestlemania 23 donald trump bodyslams beats and shaves vince mcmahon throwback video viral | Video : जेव्हा डोनाल्ड ट्रंप यांनी WWEच्या 'रिंग'मध्ये आयोजकाची धुलाई करत केलं होतं त्याचं टक्कल

Video : जेव्हा डोनाल्ड ट्रंप यांनी WWEच्या 'रिंग'मध्ये आयोजकाची धुलाई करत केलं होतं त्याचं टक्कल

Next

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक 2020मध्ये होणार आहे. आतापासूनच अमेरिकेमध्ये निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. ह्यूस्टनमध्ये आयोजित 'हाउडी मोदी'मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अबकी बार, ट्रंप सरकार' हा नारा दिला आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजेच, अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रंप यांचा प्रचार सुरू झाला आहे.  याचनिमित्ताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डोनाल्ड ट्रंप ते WWE या नामांकीत फ्री स्टाइल कुस्ती शोचे आयोजक विन्स मॅकमॅहॉन (Vince McMahon) याला मारहाण करताना दिसत असून त्याचं टक्कल करत आहेत. 

एनडीटिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रंप सपोटर्स हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत आहेत आणि विरोधकांवर निशाणा साधत सांगत आहेत की, जर या निवडणूकीमध्ये कोणीही ट्रंप यांच्याविरोधात उभं राहिलं तर त्यांची अवस्थाही राष्ट्राध्यक्ष अशीच करतील.' अमेरिकेमध्ये हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
 
डोनाल्ड ट्रंप यांचा व्हिडीओ डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष होण्याआधीचा आहे. 2007मध्ये WWE WrestleMania 23 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेटचे आयोजक विन्स मॅकमॅहॉन याला मारहाण करत त्याचं टक्कल केलं होतं. Battle of the Billionaires या मॅचमध्ये विन्स मॅकमॅहॉन याने रेसलर उमागावर बोली लावली होती. त्यावेळी त्याच्याविरोधात खेळण्यासाठी डोनाल्ड ट्रंप यांनी बॉबी लॅशलीची निवड केली होती. 

पाहा पूर्ण व्हिडीओ : 

Battle of the Billionaires या बॅटलमधील मॅच फार रंगली होती. तसेच यामध्ये फार चिटींगही झाली होती. मॅचचे रेफरी विन्स मॅकमॅहॉन याचा मुलगा शेन होता. शेनने चिटींग केली त्यामुळे त्याच्याऐवजी स्टोन कोल्ड स्टीव ऑस्टिन यांना रेफरी करण्यात आलं होतं. त्यावेळी डोनाल्ड ट्रंप यांनी निवड केलेल्या बॉबी लॅशली याने मॅच जिंकली. पण एवढ्यावरच थांबतील ते ट्रंप कसले. त्यांनी विन्स मॅकमॅहॉन याला मारहाण करत रिंगमध्ये बसवले आणि त्यांचं टक्कल केलं. जवळपास 12 वर्षांनी हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. 

Web Title: WWE wrestlemania 23 donald trump bodyslams beats and shaves vince mcmahon throwback video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.