भारताच्या १०० रूपयात लंडन शहरात काय मिळू शकतं? महिलेचा सुपरमार्केटमधील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 13:09 IST2026-04-22T13:00:23+5:302026-04-22T13:09:36+5:30

Viral Video : या व्हिडिओत एक महिला १०० रूपयांची नोट दाखवत सांगते की, भारतातील १०० रूपयाला लंडनमध्ये काय व्हॅल्यू आहे.

What can you get in London for 100 Indian rupees | भारताच्या १०० रूपयात लंडन शहरात काय मिळू शकतं? महिलेचा सुपरमार्केटमधील व्हिडीओ व्हायरल

भारताच्या १०० रूपयात लंडन शहरात काय मिळू शकतं? महिलेचा सुपरमार्केटमधील व्हिडीओ व्हायरल

Viral Video : हल्ली सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे शेकडो व्हिडीओ रोज बघायला मिळतात. यातील काही व्हिडीओ चेहऱ्यावर हसू आणणारे, काही संताप आणणारे तर काही माहीत नसलेल्या गोष्टी सांगणारे असतात. बऱ्याच व्हिडीओंमधून चांगली माहिती सु्द्धा मिळते. या व्हिडिओंच्या माध्यमातून आपलं जनरल नॉलेजही वाढतं. असाच एक माहिती देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा लंडन शहरातील एका महिलेचा व्हिडीओ असून एका स्टोरमध्ये हा व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. 

या व्हिडिओत एक महिला १०० रूपयांची नोट दाखवत सांगते की, भारतातील १०० रूपयाला लंडनमध्ये काय व्हॅल्यू आहे. म्हणजे १०० रूपयात लंडनमध्ये काय काय विकत घेऊ शकता हे महिलेने सांगितलंय. व्हिडिओत बघू शकता की, महिला एका सुपरमार्केटमध्ये जाते. ती सांगते की, १०० रूपयांची तिथे व्हॅल्यू ०.८ पाउंड आहे. मार्केटमध्ये ती वेगवेगळ्या गोष्टी बघते आणि सांगते की, ती १०० रूपयात लंडनमध्ये चीन अ‍ॅन्ड ओनिअन सँडविच, ५०० मिलीची पाण्याची बाटली, ओरिओ बिस्कीट आणि पत्ता कोबी सुद्धा घेऊ शकत नाही. कारण त्यांची किंमत जास्त आहे. शेवटी महिला सांगते की, ती १०० रूपयात केवळ गाजर खरेदी करू शकते.


हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर veggiewander नावाच्या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलाय. आतापर्यंत या व्हिडिओला ६४ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर अनेकांना कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, गाजर हेल्दी असतात. दुसऱ्याने लिहिलं की, नशीब...काहीतरी मिळालं. तर तिसऱ्याने लिहिलं की, आपल्याकडे तर इतक्या पैशात ७ पाणी बॉटल मिळतील. तर एकाने लिहिलं की, आपण भारतासोबत तुलना का करत आहात, आपल्या पगाराची तुलना का करत नाही.

Web Title : लंदन में भारतीय रुपये: महिला का सुपरमार्केट वीडियो वायरल

Web Summary : लंदन में एक महिला का 100 भारतीय रुपये के मूल्य की तुलना करते हुए एक वीडियो वायरल हुआ। उसने यह दिखाने के लिए एक सुपरमार्केट का दौरा किया कि कोई उस राशि से क्या खरीद सकता है, और उसने पाया कि वह केवल गाजर ही खरीद सकती है।

Web Title : Indian Rupees in London: Woman's Supermarket Video Goes Viral

Web Summary : A video of a woman in London comparing the value of 100 Indian rupees went viral. She visited a supermarket to show what one can buy with that amount, finding she could only afford carrots.