Video: झटपट पटापट... दुकानदाराने अवघ्या काही सेकंदात नेसून दाखवली साडी, नेटकरीही झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 21:51 IST2026-02-26T21:48:54+5:302026-02-26T21:51:53+5:30

Saree shopkeeper viral video: अनेकदा स्त्रियांनाही पटकन साडी नेसणे जमत नाही

viral video saree shopkeeper drapes it faster than anyone else social media trend | Video: झटपट पटापट... दुकानदाराने अवघ्या काही सेकंदात नेसून दाखवली साडी, नेटकरीही झाले अवाक्

Video: झटपट पटापट... दुकानदाराने अवघ्या काही सेकंदात नेसून दाखवली साडी, नेटकरीही झाले अवाक्

Saree shopkeeper viral video: साडी नेसणे ही एक कला मानली जाते. पण काही वेळा स्त्रियांनाही साडी नीट किंवा लवकर नेसता येत नाही. सोशल मीडियावर मात्र सध्या एका 'सरदारजी'चा व्हिडिओ चर्चेत आहे, जे आपल्या दुकानातील ग्राहकांना साडीचा लूक कसा दिसेल हे दाखवण्यासाठी स्वतः अगदी काही सेकंदात ती साडी नेसून दाखवतात. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा

झटपट पटापट... सरदारजींची कमाल

व्हिडिओमध्ये दिसून येते की, एका साडीच्या दुकानात काही ग्राहक साडी निवडताना गोंधळलेले असतात. अशा वेळी दुकानदार म्हणजेच सरदारजी स्वतः साडी घेतात आणि निऱ्या काढून अवघ्या काही सेकंदात ती अंगावर नेसतात. त्यांची बोटे इतक्या वेगाने चालतात की पापणी लवेपर्यंत साडीच्या निऱ्या तयार होतात आणि पदर खोचून ते उभे राहतात. ग्राहकांना साडीचा लूक व्यवस्थित समजावा यासाठी त्यांनी कसलाही संकोच न बाळगता ही कला आत्मसात केली आहे. त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा आणि कौशल्य याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा केवळ १२ सेकंदांचा व्हिडिओ आहे, पण त्यातून या दुकानदाराचे आपल्या कामाप्रती असलेले समर्पण आणि मार्केटिंगची अनोखी शैली स्पष्टपणे दिसून येते.

सोशल मीडियावरील चर्चा

हा व्हिडिओ 'X' (ट्विटर) वर @RebelliousPari8 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला हजारोंहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "घर चालवण्यासाठी एक पुरुष जमेल ते सारंकाही करत असतो." हा व्हिडिओ पाहून अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Web Title : दुकानदार ने सेकंडों में साड़ी पहनकर इंटरनेट पर मचाया तहलका।

Web Summary : एक साड़ी दुकानदार का वीडियो वायरल हो रहा है। वह ग्राहकों को लुक दिखाने के लिए खुद पर जल्दी से साड़ी लपेटता है। उनकी लगन और अनोखी मार्केटिंग की सराहना की जा रही है।

Web Title : Shopkeeper's saree draping skill amazes the internet in seconds.

Web Summary : A saree shopkeeper's video is going viral. He quickly drapes sarees on himself to show customers the look. His dedication and unique marketing are praised.